Azad Hind : विष्णू वर्धन इंदुरींच्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘आझाद हिंद’मधून पाहायला मिळणार वीरांगना दुर्गावती देवीची अज्ञात कहाणी

हा चित्रपट दुर्गा भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरांगना दुर्गावती देवीची अनकथित कथा जिवंत करेल. त्यांनी ब्रिटिश राजात लढा दिला आणि भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या महान स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. (Azad Hind: Announcement of Vishnu Vardhan Induri's new film, the untold story of Veerangana Durgavati Devi)

Azad Hind : विष्णू वर्धन इंदुरींच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 'आझाद हिंद'मधून पाहायला मिळणार वीरांगना दुर्गावती देवीची अज्ञात कहाणी

मुंबई : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (75th Independence Day), रणवीर सिंग (Ranveer Singh) अभिनीत ’83’ आणि कंगना रानौतचा  चित्रपट ‘थलाईवी’ या चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते विष्णू वर्धन इंदुरी यांनी (Vishnu Vardhan Induri) आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. यावेळी विष्णू एक देशभक्तीपर चित्रपट बनवणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘आझाद हिंद’ (Azad Hind) असून चित्रपटाची कथा स्वातंत्र्य सेनानी वीरांगना दुर्गावती देवी यांच्यावर आधारित असेल. ही तीच दुर्गावती देवी, ज्यांनी चंद्रशेखर आझाद आणि शहीद भगतसिंग यांच्यासह ब्रिटिश राजवटीची खुर्ची हलवली. ही तीच दुर्गावती, ज्यांना लोक प्रेमानं दुर्गा भाभी म्हणत असत.

दुर्गा भाभी यांची न ऐकलेली कथा

आझाद हिंद फ्रँचायझीतील पहिला चित्रपट दुर्गा भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरांगना दुर्गावती देवीची अनकथित कथा जिवंत करेल. त्यांनी ब्रिटिश राजात लढा दिला आणि भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या महान स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. ब्रिटीश सिक्रेट सर्व्हिस ब्युरो MI5 द्वारे दुर्गावतीला ‘भारताची अग्नि’ असेही म्हटले गेले.

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishnu Vardhan Induri (@vishnuinduri)

दुर्गावती देवी कोण होत्या?

दुर्गावती देवीचे खरे नाव दुर्गा देवी वोहरा होतं. त्या गुजराती ब्राह्मण कुटुंबातील होत्या, मात्र त्यांचं कुटुंब अलाहाबादमध्ये राहत होतं. त्या त्यांच्या आई -वडिलांची एकुलत्या एक होत्या. जेव्हा दुर्गावती खूप लहान होत्या तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सेवानिवृत्ती घेतली होती. दुर्गावतीला त्यांच्या मावशीनं वाढवलं. त्यांनी पाचवीपर्यंतच शिक्षण घेतलं आणि 11 वर्षांच्या असताना त्यांचं लग्न झालं. दुर्गा यांच्यातील देशभक्तीची प्रेरणा त्यांचे पती भगवंती चरण वोहरा यांच्याकडून मिळाली, जे क्रांतिकारक होते.

भगवंती चरण लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली. भगतसिंग वारंवार भगवंती चरणांच्या घरी जात असत. भगवंती चरण यांनी महाविद्यालयात असतानाच विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर NJBS चे सदस्य झाले. पतीबरोबरच क्रांतिकारक बनण्याची भावनाही दुर्गावतीमध्ये विकसित झाली होती. 1925 मध्ये, दुर्गा देवी यांनी सच्चानंद नावाच्या एका मुलाला जन्म दिला, परंतु मुलाच्या जन्मानंतर त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवला, जो त्यांनी लग्नानंतर सुरू केला होता. त्याच वेळी, जेव्हा भगतसिंग, त्याच्या साथीदारांसह, एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला होता, तेव्हा दुर्गादेवी यांनी त्यांना ब्रिटिश सैन्यापासून पळून जाण्यास मदत केली.

संबंधित बातम्या

Mile Sur Mera Tumhara : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पाहा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाणं नव्या रुपात

Happy Independence Day : भारत-पाक युद्धात नेमकं काय झालं?, या युद्धावर बनलेले ‘हे’ 5 चित्रपट पाहाच

वारकऱ्यांची पंढरी देशभक्तीच्या रंगात, पाहा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील आकर्षक फुलांची आरास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI