AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babil Khan | ‘तू इस्लाम धर्मीय आहेस का?’, चाहत्याच्या या प्रश्नावर बाबिलने दिलं धडाकेबाज उत्तर, तुम्हीही कराल कौतुक!

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. याशिवाय तो ट्रोलर्सना देखील योग्य प्रतिसाद देत राहतो. आता अलीकडेच एका वापरकर्त्याने बाबिलला विचारले की, तो मुस्लिम आहे का? बाबिलने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले नाही.

Babil Khan | ‘तू इस्लाम धर्मीय आहेस का?’, चाहत्याच्या या प्रश्नावर बाबिलने दिलं धडाकेबाज उत्तर, तुम्हीही कराल कौतुक!
बाबिल खान
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 6:55 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. याशिवाय तो ट्रोलर्सना देखील योग्य प्रतिसाद देत राहतो. आता अलीकडेच एका वापरकर्त्याने बाबिलला विचारले की, तो मुस्लिम आहे का? बाबिलने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले नाही किंवा त्यावर चिडचिडही केली नाही. उलटपक्षी त्याने या चाहत्यास सडेतोड उत्तर दिले (Babil Khan gives an epic reply to fan who asked him his religion).

बाबिल म्हणाला की, तो कोणत्याही एका धर्माचा नाही. त्याने कमेंट केली की, ‘मी बाबिल आहे’. त्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करताना बाबिलने लिहिले,  ‘मी बायबल, भगवद्गीता आणि कुराण वाचले आहे. मी आता गुरु ग्रंथ साहिब वाचत आहे. मी सर्व धर्मांचे अनुसरण करतो.’ प्रत्येकजण बाबिलच्या या उत्तराचे कौतुक करत आहे. तसे, बाबिलने आता ट्रोलर्स हाताळण्यास शिकला आहे.

कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन

अलीकडेच खान कुटुंबात एक नवीन सदस्य दाखल झाला आहे. वास्तविक, बाबिल एक कुत्रा घरी घेऊन आला आहे. ‘बहादूर जुगनू बादशाह हसबुल्ला’ असे या कुत्र्याचे नाव आहे. फोटो शेअर करताना बाबिलने लिहिले की, ‘आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य बहादूर जुगनू बादशाह हसबुल्ला आज पहिल्यांदा डॉक्टरांकडे जात आहे.’

पाहा बाबिल खानची पोस्ट

वडिलांविषयी पोस्ट करणे केले बंद

इरफानच्या मृत्यूनंतर बबिलने बर्‍याचदा त्याच्याशी संबंधित आठवणी किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा, पण त्या दरम्यान बाबिललने हे सर्व करणे थांबवले. जेव्हा एका चाहत्याने बबीलला याचे कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला की काही लोकांना वाटते की मी या पोस्ट्सच्या माध्यमातून माझा प्रचार करत आहे. हे सर्व जाणून मला खूप वाईट वाटले, म्हणून मी पोस्ट करणे थांबवले. होय, जर योग्य वेळ आली आणि आपण सर्वचजण म्हणालात तर मी निश्चितपणे त्याबद्दल पोस्ट करतच राहीन.

अभ्यासाला अलविदा

बाबिलने आपला अभ्यास सोडला आहे आणि आता त्याला पूर्णपणे अभिनयात लक्ष केंद्रित करण्याची इच्छा आहे. बाबिल हा बॅचलर ऑफ आर्ट्स शिकत होता, परंतु त्याने तो अभ्यासक्रम मध्यभागी सोडला आहे. बाबिल लवकरच ‘काला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनयाच्या जगात पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसने बनवला आहे. या चित्रपटात बाबिलबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

(Babil Khan gives an epic reply to fan who asked him his religion)

हेही वाचा :

Love Story | आईमुळे जमले होते सायरा बानो आणि दिलीप कुमारांचे लग्न, वाचा दोघांची रोमँटिक लव्हस्टोरी

Khoya Khoya Chand | रागीट स्वभावामुळे प्रसिद्ध होती तब्बूची बहीण फराह नाझ, इंडस्ट्री सोडून आता काय करतेय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.