पुणे : शाहरुख खान याचा चित्रपट पठाण २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या चाहत्यांमध्ये क्रेझ दिसत आहे. पठाण चित्रपटाची महागडी तिकिटे देखील चाहते घेताना दिसत आहेत. पठाण चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरदार होत आहे. शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. मात्र, दुसरीकडे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू झाला. इतकेच नाहीतर देशातील अनेक ठिकाणी या गाण्याच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली.
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होण्याच्या अगोदरच वातावरण तापलेले दिसत आहे. पुण्यात पठाण चित्रपटाचे पोस्टर काढण्यात आलंय. अनेकांनी आरोप केलाय की, पठाण चित्रपटामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत.
पुण्यातील राहुल टॉकीज बाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर काढून टाकले आहे. शाहरुख खान याच्या काही चाहत्यांच्या ग्रुपने चित्रपटगृहाबाहेर एक मोठे पोस्टर लावले होते.
आता हेच पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले असून राहुल टॉकीजच्या चालकांना इशारा देखील देण्यात आलाय. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहे.
शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर तो आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देखील देतोय.
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात असतानाच आता शाहरुख खान याचा पठाण चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
शाहरुख खान हा पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करतोय. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते.
मुळात म्हणजे पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून वाद निर्माण झालाय. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण ही बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. पठाणनंतर शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.