Bhushan Kumar Case Update : बलात्कार प्रकरणात नवा दावा, स्थनिक नेत्यासह मिळून अभिनेत्रीने रचला भूषण कुमारविरोधात बनाव

टी-सीरिजचे एमडी भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोपण केला होता. मात्र, आत प्रकरणात एक नवीन अँगल समोर आला आहे.

Bhushan Kumar Case Update : बलात्कार प्रकरणात नवा दावा, स्थनिक नेत्यासह मिळून अभिनेत्रीने रचला भूषण कुमारविरोधात बनाव
भूषण कुमार
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 3:28 PM

मुंबई : टी-सीरिजचे एमडी भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोपण केला होता. मात्र, आत प्रकरणात एक नवीन अँगल समोर आला आहे. ठाणे येथील स्थानिक राजकीय नेते मल्लिकार्जुन पुजारी यांनी चित्रपट निर्माते आणि टी-सीरिजचे एमडी भूषण कुमार यांच्याकडून पैसे मिळवण्यासाठी या मॉडेलसह मिळून बनव रचल्याचे कळते आहे.

मल्लिकार्जुन पुजारी यांच्या फोन रेकॉर्डिंग व ऑडिओ क्लिप तपासणीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा आरोप करणार्‍या या अभिनेत्री आणि नेत्याविरोधात विविध कलम 386, 500, 506 आणि 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टी-सीरिजने एक निवेदन जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, मल्लिकार्जुन पुजारीने जून 2021मध्ये भूषणकुमार यांच्याकडे संपर्क साधला आणि खंडणी मागितली होती, तसेच पैसे न दिल्यास आपल्याविरूद्ध लैंगिक छळाची खोटी फिर्याद केली जाईल, अशी धमकी देखील दिली होती.

मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

त्यानंतर टी-सीरिजने मल्लिकार्जुन पुजारीविरूद्ध अंबोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्याच वेळी टी-सीरिजचे कृष्णा कुमार मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी बोलले आणि पुजारीने कृष्णा कुमारला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले. यावेळी देखील पुजारीने त्यांना धमकावले. कृष्णा कुमार या खंडणी देण्यास सहमत नव्हते आणि त्यांनी पुजारीला सांगितले की, टी-सिरीज आणि भूषण कुमार अशा फसव्या खंडणी मागणाऱ्यांना कधीही भिक घालणार होणार नाहीत आणि ते परत आले.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

16 जुलै रोजी एका महिलेने भूषण कुमारवर 3 वेळा बलात्कार आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला होता, त्यानंतर टी-सीरीज कंपनी पुढे आली आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले. आपल्या निवेदनात कंपनीने हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते. यापूर्वीही भूषण कुमारवर एका मॉडेलने लैंगिक छळाचा आरोप केला होता. यावर भूषण यांची पत्नी दिव्य खोसला कुमार यांनी आपल्या पतीला उघडपणे पाठिंबा दर्शवला आणि हे सर्व काम मिळवण्याचा आणि प्रसिद्धीच्या प्रकाशात येण्याचा प्रसिद्धी स्टंट होता, भूषण कुमार पूर्णपणे निर्दोष असल्याचे तिने म्हटले आहे.

(Bhushan Kumar Case Update Mumbai Police files FIR against local political leader Mallikarjun Pujari and a female model for extortion)

हेही वाचा :

Bhushan Kumar Rape Case | T-Seriesचे मालक भूषण कुमारवर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी दाखल केला FIR

Kareena Kapoor | ‘तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’, ‘परफेक्ट’ आई होण्याबद्दल सांगताना करीना कपूर म्हणते…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.