बी टाऊनच्या अशा पार्ट्या, ज्यात कलाकार एकमेकांशीच भिडले, हाणामारीमुळे नेहमीच राहिल्या चर्चेत!

बॉलिवूड स्टार्स केवळ पडद्यावर एकत्र काम करत नाहीत, तर पडद्यामागे देखील त्यांची खूप धमाल सुरु असते. असे अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत, जे फिल्मी पार्ट्या आयोजित करण्यासाठी आणि अशा झगमगाटी पार्ट्यांमध्ये हजेरी लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

बी टाऊनच्या अशा पार्ट्या, ज्यात कलाकार एकमेकांशीच भिडले, हाणामारीमुळे नेहमीच राहिल्या चर्चेत!
Bollywood Parties

मुंबई : बॉलिवूड स्टार्स केवळ पडद्यावर एकत्र काम करत नाहीत, तर पडद्यामागे देखील त्यांची खूप धमाल सुरु असते. असे अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत, जे फिल्मी पार्ट्या आयोजित करण्यासाठी आणि अशा झगमगाटी पार्ट्यांमध्ये हजेरी लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एकीकडे, या स्टार्सची धमाल करतानाची चित्रे खूप पसंत केली जातात, तर असे काही प्रसंग आहेत जेव्हा या पार्ट्यांमध्ये काही वाद झाले आणि ही गोष्ट मोठी समस्या बनली होती.

गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक चित्रपट पार्ट्या झाल्या, ज्या कलाकारांमधील वादांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या. यातील एका पार्टीमध्ये ड्रग्जच्या वापराचा आरोप झाला होता, तर एका पार्टीत एका स्टारने दुसऱ्या स्टारला थप्पड लगावली होती. जेव्हा अशी एखादी फिल्मी पार्टी असते आणि मोठ्या स्टार्सची उपस्थिती असते, तेव्हा काही ना काही वाद अनेकदा समोर येतात.

शाहरुख खान-सलमान खान

शाहरुख खान आणि सलमान यांच्यातील संबंध नेहमीच मैत्रीचे राहिले आहेत. परंतु अनेक वेळा दोघांच्या मैत्रीमध्ये दुरावा देखील दिसून आला आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर सलमान लगेच शाहरुखच्या घरी पोहोचला होता, पण वर्ष 2008 मध्ये दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. वास्तविक, कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोन्ही स्टार्स भिडले होते, जेव्हा सलमानने शाहरुखला त्याच्या चित्रपटात कॅमिओ न केल्याबद्दल खिल्ली उडवायला सुरुवात केली. बातमीनुसार, शाहरुखने सलमानच्या फ्लॉप चित्रपटांची यादीही मोजली, त्यानंतर दोन्ही स्टार्स एकमेकांशी भिडले. असे म्हटले जाते की त्यापैकी एकाने दुसऱ्यावर हात उगारला होता. या घटनेनंतर कतरिना खूप रडली होती.

मिका-राखी

2006 मध्ये, ड्रामा क्वीन राखी सावंत चुंबन प्रकरणामुळे चर्चेत आली होती. मिका सिंहच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या पार्टीत राखी उपस्थित होती आणि ती सगळ्यांच्या चेहऱ्यावर केक लावत होती. यावर मिकाने तिला चेहऱ्यावर केक न लावण्यास मनाई केली होती. राखी सहमत नव्हती, तरीही मिकाने तिची परवानगी न मागता तिचे चुंबन घेतले होते. या प्रकरणात मिका सिंहला अटक करण्यात आली होती आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली होती.

शाहरुख-शिरीष

जेव्हा संजय दत्तचा ‘अग्निपथ’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाच्या यशानंतर मुंबईच्या नाईट क्लब निर्मात्याने संजय दत्तसाठी पार्टी ठेवली होती. बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स या पार्टीला पोहोचले होते. या दरम्यान फराह खानचा पती शिरीष कुंदर याने शाहरुखच्या चित्रपटाची खिल्ली उडवली होती, त्यानंतर शाहरुखला प्रचंड राग आला आणि त्याने शिरीषला थप्पड मारली. या घटनेनंतर शाहरुख आणि फराहच्या मैत्रीवरही परिणाम झाला होता.

करण जोहरची पार्टी

करण जोहरला बॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘पार्टी किंग’ मानले जाते. जवळजवळ सर्व स्टार्ससोबत तो पार्टी करताना दिसतो. करण अनेकदा त्याच्या पार्टीचे व्हिडीओ देखील बनवतो, जे तो सोशल मीडियावर पोस्ट करतो. असाच एक पार्टी व्हिडीओ करणने सोशल मीडियावर पोस्ट केला होता, ज्यात सर्व स्टार्स मद्यधुंद दिसत होते. अगदी असे म्हटले गेले की या पार्टीतील सर्व स्टार्सनी ड्रग्ज घेतले होते. या पार्टीबाबत मोठा वादही झाला होता.

हेही वाचा :

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!

आर्यनच्या अटकेमुळे शाहरुख खानला कोट्यवधींचा फटका, ‘या’ ब्रँडने तोडला व्यावसायिक करार

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI