हेमा मालिनी ते दिया मिर्झा, पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्रींवर लागलाय ‘सावत्र आई’चा टॅग…

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एका विवाहित व्यक्तीला हृदय देऊन बसल्या आणि नंतर त्याच्याशी लग्न केले. एवढेच नाही तर, या अभिनेत्रींच्या या पावलानंतर त्यांना सावत्र आईचा टॅगही मिळाला.

हेमा मालिनी ते दिया मिर्झा, पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या अभिनेत्रींवर लागलाय ‘सावत्र आई’चा टॅग...
Bollywod Actress

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. सेलेब्सच्या डेटिंग लाइफवर चाहत्यांची विशेष नजर असते आणि याच कारणामुळे सेलेब्ससाठी एकापेक्षा जास्त वेळा प्रेमात पडणे किंवा या इंडस्ट्रीतील घटस्फोटित व्यक्तीशी लग्न करणे हे सामान्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एका विवाहित व्यक्तीला हृदय देऊन बसल्या आणि नंतर त्याच्याशी लग्न केले.

एवढेच नाही तर, या अभिनेत्रींच्या या पावलानंतर त्यांना सावत्र आईचा टॅगही मिळाला. तर, यामध्ये, हेमा मालिनीपासून दिया मिर्झापर्यंतच्या अभिनेत्रींचा समवेश आहे. आम्ही आज अशा अभिनेत्रींबद्दल सांगतो ज्यांनी एका विवाहित पुरुषासोबत सात फेरे घेतले. तसेच, या अभिनेत्रींना सावत्र आई होण्याचा टॅगही मिळाला. पण या अभिनेत्रींनी सावत्र आईची प्रतिमा बदलली.

हेमा मालिनी

बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीने 1980 मध्ये धर्मेंद्रशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्र प्रकाश कौरसोबत आधीच वैवाहिक जीवन जगत होते आणि ते चार मुलांचे बापही होते. पण असे असूनही हेमा धर्मेंद्रशी लग्न करण्यास आणि चार मुलांची सावत्र आई होण्यास तयार झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्यात फक्त 9 वर्षांचा फरक आहे. हेमा सनीपेक्षा केवळ 9 वर्षांनी मोठ्या आहेत. मात्र, धर्मेंद्रच्या चार मुलांनी हेमा मालिनीला कधीही आईचा दर्जा दिला नाही.

करीना कपूर

करीना कपूरने 2012 मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले, जो तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे. करीना सैफची दोन मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांची सावत्र आई आहे. तथापि, करीना सारा आणि इब्राहिमसोबत एक सुंदर बाँड शेअर करते. करीना सारापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणूनच ती सारासोबत एक सावत्र आई म्हणून नाही, तर एक मैत्रीण म्हणून नातं शेअर करते.

दिया मिर्झा

दिया मिर्झा हिने 15 फेब्रुवारी 2021 रोजी व्यापारी वैभव रेखीशी लग्न केले, त्यानंतर तिचे नावही या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. वैभव आणि दिया या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. लग्नानंतर दिया वैभवची मुलगी अदाराची सावत्र आई बनली. तथापि, दिया आणि अदारा यांचे एक सुंदर नातं आहे. वैभवशी लग्न केल्यानंतर दियाने एका मुलाला जन्म दिला. अदारा देखील तिच्या सावत्र भावावर खूप प्रेम करते.

श्रीदेवी

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीने दोन मुलांचे वडील बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. जेव्हा श्रीदेवीने बोनी कपूरचा हात धरला, तेव्हा तिला ‘होम ब्रेकर’ आणि ‘स्टेप मॉम’ सारखे टॅग देण्यात आले. कारण बोनीने त्याची पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला आणि श्रीदेवीसोबत सात फेरे घेतले. मात्र, बोनी कपूरची मुले अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर यांनी श्रीदेवीला त्यांची दुसरी आई म्हणून कधीही स्वीकारले नाही. पण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुनने त्याच्या दोन लहान बहिणी जान्हवी आणि खुशीची काळजी घेत आहे.

हेही वाचा :

200 कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण, दुसऱ्यांदा समन्स बजावूनही जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर गैरहजर!

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या घरात लीपलॉक सीन, मायशा-ईशानची लव्हस्टोरीने ओलांडल्या मर्यादा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI