AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawazuddin Siddiqui | पत्नीच्या तक्रारीनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, न्यायालयाने…

या प्रकरणात आलिया हिच्या वकिलाने देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत आलियाला कशाप्रकारे त्रास दिला जातोय हे सांगितले. आता या प्रकरणात मोठे अपडेट पुढे आले आहे.

Nawazuddin Siddiqui | पत्नीच्या तक्रारीनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ, न्यायालयाने...
| Updated on: Feb 03, 2023 | 3:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी  (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बाॅलिवूडच्या (Bollywood) फेमस अभिनेता असून त्याने आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये अनेत हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी याची दुसरी पत्नी आलिया हिने त्याच्यावर काही आरोप केले आहेत. आलियाच्या या सर्व आरोपांनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. यादरम्यानच आलियाच्या विरोधात नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार (Complaint) केली आणि ही नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी नसल्याचे म्हटले. या प्रकरणात आलिया हिच्या वकिलाने देखील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत आलियाला कशाप्रकारे त्रास दिला जातोय हे सांगितले. आता या प्रकरणात मोठे अपडेट पुढे आले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची दुसरी पत्नी आलिया यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या अंधेरी कोर्टाने त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून नवाजुद्दीन सिद्दीकी याला नोटीस बजावली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईने मेहरुनिसा सिद्दीकी यांनी अभिनेत्याच्या पत्नी विरोधात पोलिसात तक्रार करत मोठा दावा केला होता. आलिया ही अभिनेत्याची पत्नी नसल्याचा मोठा दावा हा तक्रारीत करण्यात आला होता.

रिपोर्टनुसार आलियाच्या वकिलाने म्हटले होते की, आलिया ही नवाजुद्दीन सिद्दीकी याची दुसरी पत्नी आहे. वकिलाने म्हटले होते, आलियाला खूप जास्त त्रास देण्यात आला आहे. इतकेच नाही तर घरामध्ये तिला जेवण देखील दिले जात नव्हते.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबियांनी सर्वात अगोदर आलिया विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माध्यमातून अटकेची धमकी ही आलियाला दिली जात होती. आलियावर अत्याचार केले गेले तिला जेवण दिले नाही आणि झोपण्यासाठी बेडही दिली नाही, असे वकिलाने म्हटले होते.

या संपूर्ण प्रकरणात आता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याला मुंबईच्या अंधेरी कोर्टाने पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून नोटीस बजावली आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.