प्रेग्नंट नीना गुप्ताशी लग्न करण्यावर सतीश कौशिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘लग्नासाठी विचारलं तेव्हा…’

अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) नुकतेच लाँच झाले आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. चित्रपट निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी गर्भवती असताना तिला लग्नासाठी प्रस्ताव दिल्याचे नीना यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे.

प्रेग्नंट नीना गुप्ताशी लग्न करण्यावर सतीश कौशिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘लग्नासाठी विचारलं तेव्हा...’
सतीश कौशिक, नीना गुप्ता

मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचे आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ (Sach Kahun Toh) नुकतेच लाँच झाले आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. चित्रपट निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी गर्भवती असताना तिला लग्नासाठी प्रस्ताव दिल्याचे नीना यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहे. आता सतीश कौशिक यांनी एका मुलाखतीत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे (Director Satish Kaushik reaction on Neena Gupta’s biography Sach Kahun toh).

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सतीश कौशिक यांनी म्हटले की, ते नीना गुप्ता यांना 1975 पासून ओळखत आहेत आणि दोघेही खूप चांगले मित्र आहेत. ते म्हणाले की, ‘मी मित्र म्हणून तिला नेहमीच साथ देत होतो. तिला कधीही एकटे वाटावे, अशी माझी इच्छा नव्हती.’

मित्राप्रमाणे दिली साथ!

सतीश कौशिक म्हणतात, ‘मी नेहमीच तिचे कौतुक करतो की, त्यावेळी तिने लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. खर्‍या मित्राप्रमाणे मीही तिच्या बाजूने उभा राहिलो आणि तिला आत्मविश्वास दिला. जसं तुम्ही पुस्तकात वाचलंत की, मित्र म्हणून मला तिच्याबद्दल किती काळजी होती. मला सतत भीती वाटत होती की, कदाचित तिला कुठेतरी एकटं वाटेल. शेवटी मित्र हे मित्रच असतात.

नीनाच्या डोळ्यांत अश्रू!

सतीश कौशिक पुढे म्हणाले की, ‘जेव्हा मी तिला लग्नाचा प्रस्ताव दिला, तेव्हा तिला एका मित्राच्या चिंता, आदर, विनोद आणि समर्थन या सगळ्याची त्या काळात तिला आवश्यकता होती.’ चित्रपट निर्माते सतीश कौशिक पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांनी नीना गुप्ताला प्रपोज केले, तेव्हा ती खूप भावनिक झाली. ते म्हणतात, ‘मी तिला म्हणालो की, मी आहे ना, मग तू का काळजी करतेस? त्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्या दिवसापासून आमची मैत्री आणखी घट्ट झाली.

नीना गुप्ता यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, जेव्हा त्या गर्भवती होत्या, तेव्हा सतीश कौशिक त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले होते. त्यांनी तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि सांगितले की, जर मुलाचा रंग डार्क असेल तर, तो म्हणेल की ते मूल त्याचे आहे आणि दोघेही लग्न करतील. कोणालाही याबद्दल माहित देखील पडणार नाही. पण, नीनाने एकल आई बनून मसाबाला वाढवण्याचा निर्णय घेतला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या नीना गुप्ता तिच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

(Director Satish Kaushik reaction on Neena Gupta’s biography Sach Kahun toh)

हेही वाचा :

Photo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी घेतली कोरोनाप्रतिबंधक लस, पाहा फोटो

PHOTO | सौंदर्याच्याबाबतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘बबिता’लाही टक्कर देतेय ‘बापूजीं’ची पत्नी, पाहा फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI