मसाबाकडून जुन्या आठवणींना उजाळा, विव्ह रीचर्ड्स-नीना गुप्ता यांचे अनसीन फॅमिली फोटो शेअर

फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

मसाबाकडून जुन्या आठवणींना उजाळा, विव्ह रीचर्ड्स-नीना गुप्ता यांचे अनसीन फॅमिली फोटो शेअर
Masaba Gupta

मुंबई : फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. मसाबाने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स आणि आई नीनासमवेत दिसत आहे. मसाबाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मसाबाच्या या न पाहिलेल्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Masaba Gupta shares UNSEEN pictures with her parents Neena Gupta and Vivian Richards)

या थ्रोबॅक फोटोमध्ये छोटी मसाबा नीनाच्या मांडीवर दिसते. त्याचवेळी व्हिव्हियन रिचर्ड्स नीनाच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. रेड बॉर्डरवाली साडी, कपाळावर मोठी टिकली आणि दागिने परिधान केलेली नीना या फोटोत खूप सुंदर दिसतेय. व्हिव्हियन कॅज्युअल कपड्यांमध्ये बसले आहेत आणि ते त्यांच्या मुलीकडे टक लावून पाहात आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा देत हा फोटो मसाबाने शेअर केला आहे, कॅप्शनमध्ये मसाबाने लिहिलं आहे की, ‘माझं जग, माझं रक्त’ मसाबाच्या या चा शब्दांच्या कॅप्शनवरुन तिचे तिच्या आई-वडिलांवरील प्रेम दिसून येतंय. सोबत मसाबाने नीनाच्या आई-वडिलांचा म्हणजेच तिच्या आजी-आजोबांचा एक फोटो शेअर केला आहे.

नीना गुप्ताच्या बॉलिवूड करिअरसोबतच तिचं खासगी आयुष्यदेखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. विशेषतः क्रिकेटर विव्ह रीचर्ड्ससोबतच्या तिच्या नात्याची बरीच चर्चा झाली. विव्ह रीचर्ड्स आणि नीना यांनी लग्न केलं नाही मात्र त्यांना एक मुलगी आहे, तीच ही मसाबा.

रीचर्ड्स आणि नीना यांची मुलगी मसाबा ही आज फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांसाठी ती फॅशन डिझायनिंग करत असून ‘हाऊस ऑफ मसाबा’ या नावाने तिचा स्वत:चा फॅशन ब्रँडसुद्धा आहे. मसाबा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आज तिने सोशल मीडियावर शेअर केलेला तिच्या कुटुंबाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मसाबा आणि नीना या मायलेकी व्हिव्हियनसोबत राहत नाहीत. मात्र मसाबाने अनेकदा वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता तिने नीना आणि व्हिव्हियन यांचा कधीही न पाहिलेला खास फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

हेही वाचा

Bollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

Kangana Ranaut | कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार! मुंबई पोलिसांनी दाखल केला नवा एफआयआर

Jackie shroff | बॉलिवूडच्या ‘भिडू’चा असाही दिलदारपणा! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ!

(Masaba Gupta shares UNSEEN pictures with her parents Neena Gupta and Vivian Richards)

Published On - 4:28 pm, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI