Drishyam 2 अर्ध्या किंमतीत पाहू शकता; प्रदर्शनापूर्वीच टीमकडून मोठी ऑफर!

'दृश्यम 2'च्या तिकिटावर 50 टक्क्यांची सूट हवी असेल तर 'हे' वाचा

Drishyam 2 अर्ध्या किंमतीत पाहू शकता; प्रदर्शनापूर्वीच टीमकडून मोठी ऑफर!
Drishyam 2
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल

|

Oct 02, 2022 | 3:13 PM

काही दिवसांपूर्वीच अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. सस्पेन्सचा डबल डोस असलेल्या या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. ‘दृश्यम’नंतर त्याचा सीक्वेल कधी येणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांसाठी चित्रपटाच्या टीमने खास ऑफर दिली आहे. दृश्यम 2 चं तिकिट (film tickets) अर्ध्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. 2 ऑक्टोबर आणि दृश्यम या चित्रपटाचं एक वेगळंच कनेक्शन आहे. 2 अक्तूबर को क्या हुआ था, हा डायलॉग सोशल मीडियावर खूप गाजला. त्यामुळे 2 ऑक्टोबरसाठी ही खास ऑफर चित्रपटाच्या टीमने दिली आहे.

आज (2 ऑक्टोबर) चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग गेली तर त्यात 50 टक्क्यांची सूट मिळणार आहे. पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगसाठी अशा पद्धतीची ऑफर देण्यात येतेय. चित्रपटात अजय देवगणने विजय साळगावकर ही भूमिका साकारली आहे. 2 ऑक्टोबर रोजी तो त्याच्या कुटुंबीयांना घेऊन पंजिमला जातो, त्यानंतर अखेरपर्यंत त्या दिवसाचा सस्पेन्स कायम राहतो.

दृश्यम 2 येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेक पाठकने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सीक्वेलमध्ये अजयसोबत तब्बू, अक्षय खन्ना, रजत कपूर, श्रिया सरन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम 2’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दृश्यमचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या क्राईम थ्रिलरचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं होतं. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. त्यावेळी प्रेक्षक-समिक्षकांकडून चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

दृश्यम 2 चा टीझर-

चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला पहिल्या भागातील काही रिकॅप्स पहायला मिळतात. त्यानंतर कॅमेरासमोर विजय साळगावकर (अजय देवगण) त्याच्या गुन्ह्याची कबुली देताना दिसतो. “जब कोई गवाह और सबूत नही होता, तो कन्फेशन ही सबसे बडा सबूत बन जाता है,” असा तब्बूचा संवाद या टीझरच्या अखेरीस ऐकायला मिळतो. त्यानंतर अजय कॅमेरासमोर कबुली देताना पहायला मिळतो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें