AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यनच्या अटकेमुळे आता शाहरुखच्या चित्रपटांना ग्रहण, ‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार?

आत्तापर्यंत, शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगामी शूटिंग शेड्यूल पुढे ढकलले आहे. आर्यन खान, जो सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे, त्याची एनसीबी कोठडी 7 ऑक्टोबर रोजी संपत आहे.

आर्यनच्या अटकेमुळे आता शाहरुखच्या चित्रपटांना ग्रहण, ‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार?
Shah Rukh Khan
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर अभिनेत्याचं यश देखील अंधारात जात असल्याचे दिसत आहे. शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’ (Pathan) रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण असे दिसते की, चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा थांबणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय शुटिंगचे वेळापत्रक 10 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तथापि, आता असे अहवाल समोर येत आहेत की, हे वेळापत्रक पुढे ढकलले जाऊ शकते.

ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख आणि दीपिका या आठवड्यात ‘पठाण’ साठी त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सुरू करणार होते. ‘पठाण’ची टीम स्पेनला रवाना होणार होती, जिथे ते मल्लोर्का आणि कॅडिजच्या सुंदर ठिकाणी एक नेत्रदीपक रोमँटिक डान्स नंबर शूट करणार होते. यानंतर काही अॅक्शन सीन शूट करणार होते.

मेकर्स शाहरुखशिवाय शूटिंग सुरू करणार नाहीत!

आत्तापर्यंत, शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी आगामी शूटिंग शेड्यूल पुढे ढकलले आहे. आर्यन खान, जो सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे, त्याची एनसीबी कोठडी 7 ऑक्टोबर रोजी संपत आहे. असे मानले जाते की, उद्या म्हणजेच गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आर्यनला जामीन मिळू शकतो.

टीओआयच्या अहवालानुसार, निर्मात्यांचे म्हणणे आहे की, ते शाहरुख खानशिवाय पठाण चित्रपटाच्या शूटिंगला पुढे सुरु करणार नाहीत. तूर्तास ते मुंबईतील परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत आहे. त्यांना आशा आहे की, आर्यन लवकरच NCB च्या ताब्यातून सुटेल, त्यानंतर ते शाहरुखसोबत चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकतील.

शाहरुखचे कमबॅक

दीर्घ विश्रांतीनंतर शाहरुख खान ‘पठाण’च्या माध्यमातून चित्रपट पडद्यावर पुनरागमन करत आहे. दीपिका आणि शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शेवट शाहरुख खान शेवटचा आनंद एल रायच्या ‘झिरो’मध्ये दिसला होता, ज्यात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय शाहरुख साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अटलीच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. अटलीच्या चित्रपटाव्यतिरिक्त शाहरुखने राजकुमार हिरानीचा चित्रपटही साईन केला आहे.

शाहरुख खानने थांबवले शुटिंग

एकीकडे बॉलिवूडच्या बादशाहचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कस्टडीमध्ये आहे, तर दुसरीकडे शाहरुख खान आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्या एनसीबी ऑफिसमध्ये लेकाची चौअक्षी सुरु आहे, त्याच ऑफिसपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर शाहरुखच्या फिल्मचा सेट आहे. याच सेटवर आर्यनला अटक झाल्याची बातमी मिळाली तेव्हा शाहरुख खूप कोलमडून गेला होता आणि त्याने शूटिंग बंद केली. मात्र, बाकी चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे.

हेही वाचा :

आर्यन खानसोबत फोटो, एनसीबी म्हणते आमचा संबंध नाही, कोण आहे किरण गोसावी, ज्याच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप?

Aryan Khan Drug Case : कँटीनचं जेवण जेवून कोठडीत सायन्सची पुस्तकं वाचतोय आर्यन खान, वडिलांचा आवाज ऐकताच ढसाढसा रडला!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.