AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farm Laws Withdrawn : केंद्र सरकारवर नाराज कंगना रनौत, पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांनाही दिले समर्थन!

आज (19 नोव्हेंबर) पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी तिन्ही विधेयके मागे घेण्याचे जाहीर केले आहे. संसद या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अधिवेशनादरम्यान घटनात्मकदृष्ट्या रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

Farm Laws Withdrawn : केंद्र सरकारवर नाराज कंगना रनौत, पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांनाही दिले समर्थन!
Kangana Ranaut
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 3:25 PM
Share

मुंबई : आज (19 नोव्हेंबर) पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी तिन्ही विधेयके मागे घेण्याचे जाहीर केले आहे. संसद या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अधिवेशनादरम्यान घटनात्मकदृष्ट्या रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. आज या निर्णयानंतर सर्वच स्तरातून लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.  मात्र, कंगना रनौत (Kangana Ranaut) या निर्णयावर नाराज असल्याचे दिसत आहे.

कृषीविषयक तीनही कायदे मागे घेतल्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने लिहिले की, ‘दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचे… संसदेत बसलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर तेही जिहादी आहे. हा देश आहे… ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन.’

कंगनाने आनंद रंगनाथन यांचे ट्विट तिच्या स्टोरीवर शेअर केले आहे. ज्यामध्ये ते सध्याच्या सरकारच्या या निर्णयाला भ्याडपणा म्हणत आहेत. आनंदने लिहिले आहे की, सरकारचे हे भ्याड कृत्य आहे. हा देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा पराभव आहे. विरोधकांप्रमाणे नरेंद्र मोदी देशाला अनेक दशके मागे घेऊन जात आहेत. भारत हरला आहे. अराजकाचा विजय झाला आहे. वाईट दिवस येत आहेत.

शेतकर्‍यांना दहशतवादी म्हटले होते!

यापूर्वी कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कंगनाने शेतकर्‍यांना दहशतवादीही म्हटले होते. तिने लिहिलं होतं की, ‘पंतप्रधान, झोपलेल्याला उठवता येईल, गैरसमज असलेल्याला समजावता येईल, पण जो झोपला आहे, मुर्खासारखं वागतोय त्याला तुमच्या स्पष्टीकरणात काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत, CAA ने एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गमावले नाही, परंतु त्यांनी रक्ताचे पाट वाहिले आहेत.’

मात्र, या विधानानंतर कंगनावर बरीच टीका झाली. कंगनाच्या या ट्विटनंतर #Arrest_Castiest_Kangna असे वेगवेगळे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आणि कंगना रनौतला अटक करण्याची मागणी होऊ लागली. आयपीसीच्या कलम 44, 108, 153, 153 ए आणि 504 अंतर्गत अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Farm Laws | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, प्रतिक्रिया देताना तापसी पन्नू म्हणते…

Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!

Happy Birthday Sushmita Sen | ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत ऐश्वर्या रायला दिली तगडी टक्कर, एका प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिताने जिंकली मने!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.