Happy Birthday Govinda | स्वतःचा बंगला सोडून विरारमध्ये जावे लागले, ताज हॉटेलनेही नाकारली नोकरी! वाचा गोविंदाबद्दल…

अप्रतिम कॉमिक टायमिंग, जबरदस्त डान्स, दमदार अ‍ॅक्शन आणि रंगीबेरंगी चमकदार कपडे, हे 80 आणि 90च्या दशकातील गोविंदाचे (Govinda) वैशिष्ट्य होते. त्यावेळी गोविंदा जे करत होता, ते शाहरुख खान किंवा आमिर दोघांनाही करता आले नाही. गोविंदासमोर सलमानची बॉडी आणि अक्षय कुमारची धमाकेदार अ‍ॅक्शनही फिकी पडली.

Happy Birthday Govinda | स्वतःचा बंगला सोडून विरारमध्ये जावे लागले, ताज हॉटेलनेही नाकारली नोकरी! वाचा गोविंदाबद्दल...
Govinda
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 8:00 AM

मुंबई : अप्रतिम कॉमिक टायमिंग, जबरदस्त डान्स, दमदार अ‍ॅक्शन आणि रंगीबेरंगी चमकदार कपडे, हे 80 आणि 90च्या दशकातील गोविंदाचे (Govinda) वैशिष्ट्य होते. त्यावेळी गोविंदा जे करत होता, ते शाहरुख खान किंवा आमिर दोघांनाही करता आले नाही. गोविंदासमोर सलमानची बॉडी आणि अक्षय कुमारची धमाकेदार अ‍ॅक्शनही फिकी पडली.

गोविंदाचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता. विरारमधली गरिबी आणि स्वतःच्या नावाची गगनभरारीही त्यांनी पाहिली. 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईत जन्मलेल्या गोविंदाला एकदा ताज हॉटेलमध्ये देखील नोकरी नाकारण्यात आली होती.

… आणि सोडवा लागला राहता बंगला!

गोविंदाचे वडील अरुण कुमार आहुजा हे त्यांच्या काळात प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी 30-40 चित्रपटांमध्येही काम केले. त्याच वेळी, गोविंदाची आई निर्मला देवी शास्त्रीय गायिका होत्या, त्या चित्रपटांमध्ये गायच्या. एका चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान गोविंदाच्या वडिलांचे मोठे नुकसान झाले आणि त्यांना त्यांचा राहता बंगला सोडून मुंबईतील विरारला स्थायिक व्हावे लागले.

ताज हॉटेलनेही नकारली नोकरी!

गोविंदा वाणिज्य शाखेत पदवीधर होता आणि नोकरीसाठी अनेक ठिकाणी फिरला होता. नोकरीच्या शोधात तो एकदा ताज हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला नकार देण्यात आला. एका चॅट शोदरम्यान गोविंदाने सांगितले होते की, एकदा त्याच्या आईला कुठेतरी जायचे होते आणि तो तिच्यासोबत मुंबईतील खार स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत होता. गाड्या तुडुंब भरून आल्या. गर्दीमुळे त्याने अनेक गाड्या सोडल्या. याचं दुःख होऊन गोविंदा ताबडतोब एका नातेवाईकाकडे धावला आणि त्याच्याकडून काही पैसे उसने घेऊन आईला फर्स्ट क्लासचा पास मिळवून दिला.

पहिली जाहिरात मिळाली अन्….

या घटनेने गोविंदा हादरला आणि त्यानंतर तो सर्व काही विसरून कामाला लागला. 80च्या दशकात त्याला प्रथम एल्विन नावाच्या कंपनीची जाहिरात मिळाली आणि त्यानंतर तो कधीही थांबला नाही आणि त्याने कधीही मागे वळून पहिले नाही. 1986 मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘इलजाम’ रिलीज झाला आणि मोठ्या पडद्यावर त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झाला.

आपल्या करिअरमध्ये गोविंदाने जवळपास 165 चित्रपटांमध्ये काम केले. त्याला 11 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकण्यात त्याला यश मिळाले. त्याचबरोबर त्याने आपल्या कारकिर्दीत चार वेळा ‘झी सिने’ पुरस्कारही पटकावला आहे.

हेही वाचा :

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.