Happy Birthday Harsh Varrdhan Kapoor | रिया चक्रवर्ती-जॅकलिनसोबत जोडले गेलेय हर्षवर्धन कपूरचे नाव, जाणून घ्या अभिनेत्याबद्दलच्या खास गोष्टी…

हर्षवर्धन यंदा त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हर्षवर्धन कपूरनेही अभिनयात नशीब आजमावले आहे. मात्र, तो आपल्या वडील आणि बहिणीप्रमाणे फिल्मी दुनियेत नाव कमवू शकला नाही. हर्षवर्धनच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत…

Happy Birthday Harsh Varrdhan Kapoor | रिया चक्रवर्ती-जॅकलिनसोबत जोडले गेलेय हर्षवर्धन कपूरचे नाव, जाणून घ्या अभिनेत्याबद्दलच्या खास गोष्टी...
Harsh Varrdhan Kapoor
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 8:26 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर (Harsh Varrdhan Kapoor) याचा जन्म 9 नोव्हेंबर 1990 रोजी मुंबईतच झाला. हर्षवर्धन यंदा त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हर्षवर्धन कपूरनेही अभिनयात नशीब आजमावले आहे. मात्र, तो आपल्या वडील आणि बहिणीप्रमाणे फिल्मी दुनियेत नाव कमवू शकला नाही. हर्षवर्धनच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत…

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत हर्षवर्धनने चित्रपटांच्या जगात स्वत:चे नाव कमावण्याचा मानस ठेवला. चित्रपटांमध्ये नायक म्हणून पदार्पण करण्यापूर्वी हर्षवर्धनला चित्रपट निर्मितीतील बारकावे पाहण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा होती. याच कारणामुळे 2015 मध्ये हर्षवर्धनने ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

पहिल्याच चित्रपटासाठी मिळवले पुरस्कार

हर्षवर्धनने 2016 मध्ये ‘मिर्जया’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हर्षला ‘मिर्जया’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा ‘स्टार स्क्रीन’ आणि ‘स्टारडस्ट’ पुरस्कारही जिंकला.

फ्लॉप स्टार किड्समध्ये गणना!

यानंतर हर्षवर्धन 2018 मध्ये ‘भावेश जोशी सुपरहिरो’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटातील हर्षवर्धनच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते. पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. हर्षवर्धन स्वतःला सिद्ध करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण नशिबाने म्हणा किंवा त्याची कथेची निवड चुकीची होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हर्षवर्धनची गणना आता बॉलिवूडच्या ‘फ्लॉप स्टार किड्स’मध्ये केली जाते.

वडिलांसोबत मित्रत्वाचे नाते

हर्षवर्धन आणि अनिल कपूरच्या बाँडिंगबद्दल सांगायचे तर, दोघेही पिता-पुत्र एकमेकांसोबत मित्रांसारखे राहतात. हर्ष अनेकदा वडिलांसोबत वर्कआउट करताना दिसतो. वडील आणि बहिणी प्रमाणे बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी तो त्याच्या फिटनेस आणि कामगिरीवरही पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो.

‘या’ कारणामुळे इंडस्ट्रीत प्रसिद्ध

लाखो प्रयत्न करूनही हर्षवर्धन पापा अनिल कपूरच्या स्टारडमला स्पर्श करू शकला नाही. मात्र, एका बाबतीत तो वडील अनिल कपूर यांच्यापेक्षा चार पावले पुढे आहे. वडील अनिल कपूर यांच्याप्रमाणे हर्षवर्धन चित्रपटांच्या दुनियेत काही खास करू शकला नसेल, पण मुलींमध्ये हर्षवर्धनची वेगळीच क्रेझ आहे. रिपोर्ट्सनुसार, कॅसानोव्हा हर्षवर्धन त्याच्या ‘हार्टथ्रोब’ शैलीसाठी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. सारा अली खान रिया चक्रवर्ती, सपना पब्बी आणि जॅकलिन फर्नांडिससोबत त्याचे नाव जोडले गेले आहे.

कोणकोणत्या अभिनेत्रींना केले डेट?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करण्यापूर्वी रिया चक्रवर्ती हर्षवर्धन कपूरला डेट करायची. मात्र लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले. हर्षवर्धनने सारा अली खानलाही डेट केले आहे. पण सारासोबतही हर्षवर्धनची प्रेमकहाणी खूपच छोटी होती.

टीव्ही मालिका ’24’ मध्ये अनिल कपूरच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सपना पब्बी हिच्यासोबतही हर्षवर्धनचे अफेअर होते. त्या दिवसांत हर्षवर्धन ‘मिर्जया’ या चित्रपटातून पदार्पण करण्याच्या तयारीत होता. अशा परिस्थितीत हर्षवर्धनने कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे, अशी अनिल कपूरची इच्छा होती. म्हणूनच हर्षवर्धन आणि सपनाच्या ब्रेकअपसाठी अनिल कपूरला जबाबदार मानले जाते.

हर्षवर्धनचे नाव ‘बियॉन्ड द क्लाउड’ अभिनेत्री मालविका मोहनसोबतही जोडले गेले होते. दोघे अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसले. मात्र, नंतर मालविकाही हर्षवर्धनच्या आयुष्यातून गायब झाली. जॅकललिन फर्नांडिस आणि हर्षवर्धन यांच्या जवळीकतेचे किस्सेही सोशल मीडियावर खूप चर्चेत होते. मात्र, ही जोडी देखील जमू शकली नाही!

हेही वाचा :

ईशा गुप्ताचा इंटरनेटवर ग्लॅमरचा तडका, फॉर्मल लूकमध्येही दिसला कातिलाना अंदाज! पाहा फोटो…

‘राणादा’ फेम हार्दिक जोशीच्या आयुष्यात आली खास नवी पाहुणी, संपूर्ण कुटुंबाकडून जोशात स्वागत!

Non Stop LIVE Update
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा...
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा....
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?.
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार.
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण.
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर.
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.