‘राणादा’ फेम हार्दिक जोशीच्या आयुष्यात आली खास नवी पाहुणी, संपूर्ण कुटुंबाकडून जोशात स्वागत!

राणादा’ म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता हार्दिक जोशी आजही महाराष्ट्राच्या घराघरांत लाडका आहे. सर्वांच्या लाडक्या राणादाच्या चाहत्यांना दिवाळी निमित्त या पाहुणीची झलक पाहायला मिळाली आहे. या रांगड्या अभिनेत्याने ‘महिंद्र बुलेरो’ ही नवी गाडी खरेदी केली आहे.

‘राणादा’ फेम हार्दिक जोशीच्या आयुष्यात आली खास नवी पाहुणी, संपूर्ण कुटुंबाकडून जोशात स्वागत!
Hardeek Joshi
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 2:19 PM

मुंबई : प्रेक्षकांचा लाडका ‘राणा दा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) याच्या आयुष्यात एक नवी पाहुणी आली आहे. ही पाहुणी कुणी मुलगी नसून, त्याची नवी गाडी आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका नुकतीच किंही महिन्यांपूर्वी ऑफ एअर गेली आहे. ही मालिका तब्बल चार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाईंची जोडी आजही सुपरहिट ऑनस्क्रीन जोडी आहे. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी या मालिकेवर आणि मालिकेमधील कलाकारांवरील प्रेक्षकांचं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. ‘तुझ्यात जीव रंगला नंतर आता हार्दिक जोशी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत झळकत आहे.

‘राणादा’ म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता हार्दिक जोशी आजही महाराष्ट्राच्या घराघरांत लाडका आहे. सर्वांच्या लाडक्या राणादाच्या चाहत्यांना दिवाळी निमित्त या पाहुणीची झलक पाहायला मिळाली आहे. या रांगड्या अभिनेत्याने ‘महिंद्र बुलेरो’ ही नवी गाडी खरेदी केली आहे. संपूर्ण कुटुंबाने अतिशय जोशात या नव्या पाहुणीचं घरी स्वागत केलं.

पाहा व्हिडीओ :

‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली नवी मालिका ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यात हार्दिक मुख्य भूमिका साकारत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर आता हार्दिक जोशी आता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ असं म्हणतोय. या मालिकेत नवोदित अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत दिसत आहे. मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

हार्दिक जोशीचं दमदार पुनरागमन

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला आणि त्यात हार्दिक जोशी सकारात असलेल्या ‘राणा दा’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ही मालिका बंद झाल्यानंतरही चाहते त्यातील कलाकारांच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळेच हार्दिक जोशीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदित झाले आहेत.

अभिनेता हार्दिक जोशी हा मुळचा मुंबईचा रहिवासी आहे. त्याच शिक्षण आणि बालपण देखील मुंबईतच गेलं. मात्र, मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्याला कोल्हापुरात राहावं लागलं होतं. तब्बल चार ते साडे चार वर्ष कोल्हापूरमध्ये राहिलेल्या हार्दिकला कोल्हापूरचा आणि तिथल्या लोकांचा लळा लागला होता. कॉलेजमध्ये असताना त्याने मॉडेलिंग करत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने ‘रंगा पतंगा’ यासरख्या चित्रपटात पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. तसेच, त्याने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

सैन्यात भरती व्हायचे होते…

कॉलेजमध्ये असताना हार्दिक मॉडेलिंग करायचा. पण त्यात करिअर करण्याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. त्याला आर्मीत करिअर करायचं होतं. 2011मध्ये त्याची आर्मीत निवडही झाली होती. त्यावेळी चंदीगडमध्ये एसएसबीचं (सशस्त्र सीमा दल) ट्रेनिंगही त्यानं पूर्ण केलं होतं. पण काही कारणामुळे त्याला कॉल आला नाही. मात्र, अजूनही आर्मीत जाण्याची माझी इच्छा आहे, असं हार्दिक म्हणतो. एसएसबीमध्ये निवड न झाल्याने, तो मुंबईला परत आला आणि फोटोशूट केलं. तिथूनच त्याचा मनोरंजन विश्वातला प्रवास सुरु झाला होता. आता पुन्हा एकदा नव्याने तो व्यवसायात पदार्पण करत आहे. अशावेळी त्याने आपल्या चाहत्यांचा पाठींबा मागितला आहे.

हेही वाचा :

ना नवा चित्रपट, ना कसलं सेलिब्रेशन तरी सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #SalmanKhan, पाहा नेमकं प्रकरण काय?

Padma Shri Awards 2020 : बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना रनौतसह गायक अदनान सामीचा ‘पद्मश्री’ देऊन सन्मान! पाहा फोटो

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.