AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Rekha | एव्हरग्रीन अभिनेत्री अन् सौंदर्याची खाण रेखा, वाचा अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी…

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) हे अभिनय विश्वातील एक असं नाव आहे, ज्याच्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अभिनेत्री रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास येथे झाला. त्यांचे वडील जेमिनी गणेशन सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते होते आणि आई पुष्पवल्ली एक अभिनेत्री होत्या.

Happy Birthday Rekha | एव्हरग्रीन अभिनेत्री अन् सौंदर्याची खाण रेखा, वाचा अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी...
Rekha
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 8:36 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) हे अभिनय विश्वातील एक असं नाव आहे, ज्याच्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अभिनेत्री रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास येथे झाला. त्यांचे वडील जेमिनी गणेशन सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते होते आणि आई पुष्पवल्ली एक अभिनेत्री होत्या. रेखाचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन आहे. रेखा त्यांच्या सौंदर्यासाठी, मोहक अभिनयासाठी आणि बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.

रेखाच्या पालकांनी गुपचूप लग्न केले होते आणि दोघेही वेगळे राहत होते. रेखाच्या वडिलांनी रेखाला कधीच आपली मुलगी मानले नाही, यामुळे रेखा नेहमी आपल्या वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिल्या. रेखा यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण चर्च पार्क कॉन्व्हेंट स्कूलमधून केले. परंतु, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे रेखा यांना आपला अभ्यास मध्यंतरी सोडावा लागला. यानंतर रेखानेही तिच्या आई-वडिलांप्रमाणे अभिनय जगात प्रवेश केला आणि ‘रंगुला रत्नम’ या तेलगू चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

बालकलाकार म्हणून सुरुवात

पण, या दरम्यान रेखा यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रेखाला कुरुप म्हणत अनेकांनी काम देण्यास नकार दिला, पण रेखा यांनी कधीही हार मानली नाही. 1970मध्ये रेखा यांनी बॉलिवूडमध्ये ‘सावन भादो’ या हिंदी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर रेखा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसल्या आणि त्यांनी त्यांच्या चमकदार अभिनयाने हे सिद्ध केले की, त्या चित्रपटातील प्रत्येक प्रकारचे पात्र उत्तम प्रकारे साकारण्यास सक्षम आहे.

180हून अधिक चित्रपटात काम

काळाबरोबरच  रेखाने आपले सौंदर्य, शैली, मेहनत, संघर्ष, समर्पण आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयाला इतका स्पर्श केला की, प्रत्येकजण त्यांचा प्रशंसक बनला. रेखा यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 180हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ज्यात ‘जमीन आस्मान’, ‘नमक हराम’, ‘नागिन’, ‘आप की खातिर’, ‘खून-पसीना’, ‘सुंदर’, ‘उमराव जान’, ‘सिलसिला’, ‘लज्जा’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कोई मिल गया’, ‘शमिताभ’ इत्यादींचा समावेश आहे. चित्रपटांमध्ये अभिनय करण्याशिवाय, रेखा यांनी काही चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली आहेत, ज्यात त्यांच्या ‘सुंदर’ चित्रपटातील ‘सारे नियम तोड दो’ या गाण्याचा समावेश आहे.

अनेक पुरस्कारांवर कोरलेय नाव

रेखा यांना चित्रपटांमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल 2010 मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय, रेखा यांना एक राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रेखा दीर्घकाळ राजकारणातही सक्रिय होत्या.

वैयक्तिक आयुष्यात मात्र एकट्याच!

रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी 1990मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले. परंतु, नैराश्याने ग्रस्त असलेल्या मुकेशने लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आत्महत्या केली. यानंतर रेखा आयुष्यात एकटीच प्रवास करत आहे. रेखा आता अभिनय जगापासून काहीशा दूर आहेत, पण आजही त्यांचे सौंदर्य आणि शैली अबाधित आहे. रिअॅलिटी शोजमध्ये त्यांना अनेक वेळा पाहुणी परीक्षक म्हणून बोलावले जाते.

हेही वाचा :

The Kapil Sharma Show : ‘या’ कारणामुळे कपिल शर्मावर रागवला सैफ आली खान, शक्ती कपूरशी होते नाराजीचे कनेक्शन!

‘Squid Game’ तब्बल 10 वर्ष करावा लागला होता नकाराचा सामना, आता ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय सीरीज!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.