Happy Birthday Surveen Chawla | पाचवेळा कास्टिंग काऊचला बळी पडली, आता छोट्या पडद्यावर कमबॅक करू इच्छित नाही सुरवीन चावला

दूरदर्शनवरील मालिका ‘कहीं तो होगा’ या मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) आज (8 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. छोट्या पडद्यावरून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या अभिनेत्रीला मात्र आता टीव्हीवर परतण्याची इच्छा नाहीये.

Happy Birthday Surveen Chawla | पाचवेळा कास्टिंग काऊचला बळी पडली, आता छोट्या पडद्यावर कमबॅक करू इच्छित नाही सुरवीन चावला
सुवरीन चावला

मुंबई : दूरदर्शनवरील मालिका ‘कहीं तो होगा’ या मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) आज (8 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. छोट्या पडद्यावरून प्रसिद्धी मिळवणाऱ्या या अभिनेत्रीला मात्र आता टीव्हीवर परतण्याची इच्छा नाहीये. ‘सेक्रेड गेम्स 2’मधून आपल्या  अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलेल्या सुरवीनला आता मात्र टीव्हीवर परतण्याची इच्छा नाही.

सुरवीनने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले. तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर, सुरवीनने बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. सुरवीनला पहिल्या मालिकेतून लोकांमध्ये लोकप्रियता मिळाली पण आता तीच सुरवीन कधीच टीव्हीवर परतू इच्छित नाही.

असं का म्हणाली सुरवीन?

एका मुलाखतीदरम्यान सुरवीन चावला म्हणाली की, “आपले टेलिव्हिजन शो अजूनही त्यांच्या कंटेंटवर जास्त प्रयोग करत नाहीत. इथे फारसा बदल होत नाही. म्हणूनच आता मला त्यात काम करायचे नाही.’ ती पुढे म्हणाला की, ‘मालिकांमध्ये काम केल्याने मला समाधान मिळत नाही. आजच्या चित्रपटांच्या आशयामध्ये खूप बदल होत आहेत. चित्रपटांमध्ये निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक त्यांच्या स्क्रिप्टमध्ये अनेक प्रयोग करत असतात. बदल आणण्यासाठी खूप लक्ष केंद्रित केले आहे.’

एक दोन नव्हे, तब्बल 5 वेळा कास्टिंग काऊचला बळी!

सुरवीन चावलाने खुलासा केला की, ती पाच वेळा कास्टिंग काऊचला बळी पडली आहे. तिने सांगितले की अनेक दिग्दर्शकांनी त्याच्या शरीरावर अश्लील टिप्पण्या केल्या आहेत. एका दिग्दर्शकानं तर असंही म्हटलं की, मला तुमचा क्लीवेज लूक पाहायचा आहे.

इतर दिग्दर्शकाबद्दल बोलताना सुरवीन चावला म्हणाली की, ‘दक्षिण चित्रपटांचे एक दिग्दर्शक मला सांगत होते की, मला तुमच्या शरीराचा प्रत्येक इंच पाहायचा आहे. हे ऐकून माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना.’ सुरवीन चावलालाही तिच्या वजनामुळे देखील खूप त्रास सहन करावा लागला. ती म्हणाली- ‘मी जिथे ऑडिशन देण्यासाठी गेलो होतो तिथे एका व्यक्तीने मला सांगितले की, माझे वजन जास्त आहे,मात्र तेव्हा माझे वजन फक्त 56 किलो होते.’

हेट स्टोरी 2नंतर डिप्रेशनमध्ये!

‘हेट स्टोरी 2’ या बॉलिवूड चित्रपटात सुरवीन चावला मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटावर बोलताना ती म्हणाली की, ‘हेट स्टोरी रिलीज झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला वाटल्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. मी हा चित्रपट केला याचा मला आनंद झाला, पण गोष्टी यापेक्षा खूप वेगळ्या होत्या. यामुळे लोकांची दृष्टी बदलली होती.’ सध्या सुवरीन मातृत्वाचा आनंद लुटत आहे. 2019मध्ये तिने बाळाला जन्म दिला आणि मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला.

(Happy Birthday Surveen Chawla Actress face casting couch for 5 times)

हेही वाचा :

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ म्हणत ‘ही’ अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!

अनिरुद्ध देशमुखशी घटस्फोटानंतर ‘आई’ बदलणार? नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI