Priyanka Chopra : न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राचा ‘देसी तडका’; नवे रेस्टॉरंट उघडले!

अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं न्यूयॉर्कमध्ये आपलं रेस्टॉरंट उघडलं आहे. (Indian Restaurant in New York, Priyanka Chopra's new Business)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:33 PM, 7 Mar 2021
Priyanka Chopra : न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राचा 'देसी तडका'; नवे रेस्टॉरंट उघडले!

मुंबई : प्रियंका चोप्रा एकामागून एक नवीन उपक्रम सुरू करत आहे. अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं न्यूयॉर्कमध्ये आपलं रेस्टॉरंट उघडलं आहे. प्रियंकानं इंस्टाग्रामवर फक्त पोस्टच शेअर केली नाही तर रेस्टॉरंटचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये रेस्टॉरंटच्या शुभारंभासाठी प्रियंका पूजा करताना दिसतेय. यावेळी निक जोनससुद्धा तिच्यासोबत दिसतोय. (Indian Restaurant in New York, Priyanka Chopra’s new Business)

पाहा प्रियंकाची पोस्ट Priyanka Chopra’s Instagram Post

प्रियंका म्हणते ‘सोनासाठी मी प्रचंड उत्सुक’

प्रियंकानं लिहिलं की, सोनाला तुमच्यासमोर सादर करण्यास मी खूप उत्सुक आहे. न्यूयॉर्कमध्ये आम्ही सोना रेस्टॉरंट सुरू केलं आहे. सोनाचं हे स्वयंपाकघर अतिशय शेफ हरी नायक हाताळत आहेत. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला आहे. हे डिझाइन करणार्‍या आमच्या डिझाइनरचेसुद्धा आभार.

न्यूयॉर्कमध्ये अस्सल भारतीय हॉटेल

महत्वाचं म्हणजे प्रियंकानं सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये अस्सल भारतीय जेवण मिळणार आहे. त्यामुळे आता न्यूयॉर्कमधील लोकांनासुद्धा भारतीय जेवण चाखता येणार आहे. त्यामुळे ही अभिमानास्पद बाब आहे.

अनफिनिश्ड पुस्तकात केला गौप्यस्पोट

प्रियंका जेव्हा हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी गेली तेव्हा तिला भारतात परत जाण्यास सांगितलं गेलं होतं. इतकंच नाही तर काहींनी असंही म्हटलं की आपल्या देशात जाऊन सामूहिक बलात्कार करा. हे तिनं तिच्या ‘अनफिनिश्ड’या पुस्तकात लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच

तर काही दिवसांपूर्वीच प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला. प्रियंकानं स्वत: ही माहिती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तसेच आता प्रियंका अभिनयासोबतच व्यवसायातही पहिल्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामनं एक यादी शेअर केली आहे ज्यामध्ये कोणते कलाकार इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी किती रुपये घेतात. या टॉप 100 लोकांमध्ये फक्त 2 भारतीयांचा समावेश आहे. ते म्हणजे प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली.

संंबंधित बातम्या

आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!

Happy Birthday Anupam Kher : अनेक आव्हानं आणि समस्यांवर मात, वाचा अभिनेते अनुपम खेर यांच्या आयुष्यातील संघर्ष