Khoya Khoya Chand | ‘मर्डर’मध्ये इमरान हाश्मीसोबतचा रोमान्स अजूनही चर्चेत, पाहा आता काय करतेय मल्लिका शेरावत

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) चित्रपटात येण्यापूर्वी अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. यानंतर ती म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली होती.

Khoya Khoya Chand | ‘मर्डर’मध्ये इमरान हाश्मीसोबतचा रोमान्स अजूनही चर्चेत, पाहा आता काय करतेय मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) चित्रपटात येण्यापूर्वी अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. यानंतर ती म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली होती. मल्लिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात मल्लिकाचे पात्र खूपच लहान होते. यानंतर, मल्लिका 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘ख्वाहिश’ चित्रपटाने लोकांच्या नजरेत आली आणि नंतर 2004मध्ये मल्लिकाच्या ‘मर्डर’ चित्रपटाने लोकांना वेडच लावले.

मल्लिकाने इमरान हाश्मीसोबत ‘मर्डर’ चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स केले होते. दोघांचे ‘भीगे होंठ तेरे’ हे गाणे आजही बॉलिवूडच्या बोल्ड आणि रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटानंतर मल्लिकाला बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीचा टॅग मिळाला.

बऱ्याच चित्रपटानंतर मल्लिका झाली गायब!

‘मर्डर’ या सुपरहिट चित्रपटात मल्लिका शेरावत ‘सिमरन’च्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली होती. त्यानंतर मल्लिका ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘आप का सूरूर’, ‘वेलकम’ आणि ‘डबल धमाल’ या सिनेमांमध्ये दिसली होती. 2019 मध्ये, मल्लिकाने ऑल्ट बालाजीची वेब सीरीज ‘बू सबकी फाटेगी’ द्वारे डिजिटल विश्वात पदार्पण केले. या सीरीजमध्ये ती तुषार कपूरसोबत दिसली होती. मात्र, त्यानंतर सध्या ती मनोरंजन विश्वातून गायब झाली आहे.

जॅकी चॅनसोबत केले काम

मल्लिकाने 2005 साली पुन्हा एकदा ‘द मिथ’ या चित्रपटात काम केले. मल्लिकाने या चित्रपटात काम करून सर्वांना आश्चर्ययाचा धक्काच दिला होता. या चित्रपटात मल्लिकाने जॅकी चॅनसोबत काम केले होते. मल्लिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण तिला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ती फक्त केवळ एक ग्लॅमर म्हणून चित्रपटांमध्ये दिसली. तर काही चित्रपटांमध्ये तिला फक्त गेस्ट अपिअरन्स मिळाला आहे.

मल्लिका शेवट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बू सबकी फटेगी’ या वेब सीरीजमध्ये दिसली होती. यामध्ये मल्लिकाने भुताची भूमिका साकारली होती. ही सीरीज एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस ऑल्ट बालाजीवर प्रसारित झाली. आता रिपोर्ट्सनुसार, मल्लिका ‘रोझी: द केसर चॅप्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारेच श्वेता तिवारीची मुलगी पलक अभिनय विश्वात प्रवेश करणार आहे.

आता कुठे आहे मल्लिका?

मल्लिका सध्या लॉस एंजेलिसमध्ये राहते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या व्हिलाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते. मल्लिका 2013 मध्ये अमेरिकेत शिफ्ट झाली आणि सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या या लक्झरी व्हिलाचा व्हिडीओ शेअर केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हेही वाचा :

वयाच्या 56व्या वर्षीही आमिर खानचं जबरदस्त वर्कआऊट सेशन, पाहा लेक आयराची भन्नाट प्रतिक्रिया…

‘जोधा अकबर’ फेम अभिनेता मोठ्या आर्थिक अडचणीत, आजारपणामुळे कापावा लागला पाय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI