केवळ नृत्य बघूनच माधुरी दीक्षितला केलं साईन, अभिनेत्रीच्या करिअरमध्ये सुभाष घईंचा मोठा वाटा! वाचा किस्सा…

सुभाष घई हे असे एक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘परदेस’ ते ‘ताल’पर्यंत, सुभाष घई त्यांच्या संगीत चित्रपटांसाठी ओळखले जात होते. पण यासोबतच सुभाष घई अनेक अभिनेत्रींचे करिअर बनवण्यासाठीही प्रसिद्ध होते.

केवळ नृत्य बघूनच माधुरी दीक्षितला केलं साईन, अभिनेत्रीच्या करिअरमध्ये सुभाष घईंचा मोठा वाटा! वाचा किस्सा...
Madhuri Dixit

मुंबई : सुभाष घई हे असे एक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘परदेस’ ते ‘ताल’पर्यंत, सुभाष घई त्यांच्या संगीत चित्रपटांसाठी ओळखले जात होते. पण यासोबतच सुभाष घई अनेक अभिनेत्रींचे करिअर बनवण्यासाठीही प्रसिद्ध होते. महिमा चौधरीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींचे करिअर घडवण्यात सुभाष घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) एका शो दरम्यान तिच्या आणि सुभाष घईच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता.

माधुरी दीक्षितची कारकीर्द पुढे नेण्यात सुभाष घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुभाष घई हे दिग्दर्शक होते, ज्यामुळे लोक माधुरी दीक्षितला ओळखू लागले. माधुरी दीक्षित काश्मीरमध्ये पहिल्यांदा सुभाष घई यांना भेटली. माधुरी दीक्षितला इथे पाहून तिला थेट चित्रपटासाठी कास्ट करण्याचे ठरवले. वास्तविक माधुरी दीक्षितने खुलासा केला होता की, तिच्या केशभूषाकाराने तिचे फोटो सुभाष घई यांच्याकडे नेले होते.

त्यावेळी सुभाष घई काश्मीरमध्ये ‘कर्मा’ चित्रपटाचे शूटिंग करत होते.  माधुरी दीक्षित त्यावेळी ‘आवारा बाप’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. फोटो पाहिल्यानंतर सुभाष घईंनी तिला त्यांच्याकडे बोलावले आणि माधुरीला विचारले की, तू नाचशील का? त्या वेळी सरोज खानही तेथे उपस्थित होत्या. सुभाषजींनी माधुरीला त्यांना भेटायला बोलवले. यावेळी दिग्दर्शक सोहनलाल कंवर यांनी माधुरीचे कौतुक केले.

सुभाषजींनी केले लाँच

अभिनेत्री माधुरी दीक्षित या चित्रपटात लाँच केले, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांची सरोज खानशी ओळख झाली तेव्हा त्यांनी एक छोटसं नृत्य करून दाखवलं. ती म्हणाला, ‘माझा डान्स पाहिल्यानंतर सुभाष घई जी म्हणाले की, तुम्ही या छोट्या भूमिका करू नका. तुझ्यात ती प्रतिभा आहे. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात प्रतिभा दाखवण्याची संधी दिली. त्यानंतर आज मी तुमच्या समोर उभी आहे.’

असा मिळाला चित्रपट

माधुरीने तिच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट कसा मिळाला हे सांगताना म्हटले की, ‘एन चंद्रा हा चित्रपट बनवत होते, त्यांनी मला पाहिले आणि सांगितले की, मला ही मुलगी माझ्या चित्रपटात हवी आहे. जेव्हा मी कथा ऐकली तेव्हा मला ती आवडली. चित्रपटाचे गाणे ऐकल्यावर मला हसू आले. पण एक-दोन गाणी ऐकल्यानंतर मला वाटले की, हे गाणे सुपरहिट आहे. या गाण्यानंतर लोक मला मोहिनी म्हणून ओळखू लागले. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते.

अनिल कपूरसह जमली जोडी!

1988मध्ये रिलीज झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटात अनिल कपूर, चंकी पांडे आणि अनुपम खेर दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर अनिल कपूर आणि माधुरीची जोडी इतर चित्रपटांमध्येही दिसली. या दोघांच्या जोडीला चित्रपट पडद्यावर चाहत्यांनी चांगली पसंती दिली.

हेही वाचा :

Samantha-Naga Chaitanya Divorce | अफेयर, करिअर की आणखी काही? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय?

Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’, समंथा-नागा चैतन्यने केली घटस्फोटाची घोषणा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI