AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनिष पॉलने उडवली मलायकाच्या ‘डक वॉक’ची खिल्ली; पहा व्हायरल Video

2021 मध्ये मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 (Filmfare Awards 2022) मध्ये सूत्रसंचालक मनिष पॉलने (Maniesh Paul) पुन्हा एकदा मलायकाच्या चालण्याच्या स्टाइलची खिल्ली उडवली.

मनिष पॉलने उडवली मलायकाच्या 'डक वॉक'ची खिल्ली; पहा व्हायरल Video
मलायकाच्या चालण्यावरून मनिष पॉलची मस्करीImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 5:39 PM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या फिटनेसमुळे आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. पापाराझींनी शूट केलेले तिचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यातील तिच्या चालण्याच्या स्टाइलवरून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली होती. 2021 मध्ये मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 (Filmfare Awards 2022) मध्ये सूत्रसंचालक मनिष पॉलने (Maniesh Paul) पुन्हा एकदा मलायकाच्या चालण्याच्या स्टाइलची खिल्ली उडवली.

फिल्मफेअरच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मनिष मलायकाला विचारतो की, तू कधी गोल्फ खेळली आहेस का? त्यावर मलायका नकारार्थी उत्तर देते. मनिष तिच्यासारखं चालताना दाखवत पुढे म्हणतो, “गोल्फ कोर्ट्स तुझी चालण्याची वाट पाहत आहेत.” त्यावर मलायका जोरात हसते आणि पुन्हा चालून दाखवायला सांगते. मनिष तिला म्हणतो, “जेव्हा पण तू पिलाटेस क्लासेसला जाते, तेव्हा आम्ही क्लासच्या बाहेर उभे असतो. कुत्रे खूप खूश होतात, जेव्हा तू त्यांच्या अवतीभवती चालतेस.” मनिष पॉलचं ऐकून वरुण धवन, परिणीती चोप्रासह मलायकासुद्धा जोरजोरात हसू लागते.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

मलायकाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन हा तिच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान आहे. माध्यमांसमोर ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये मोकळेपणे व्यक्त होताना दिसतात. मलायकाने अरबाज खानशी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.