RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

यावर्षीचा मोस्ट अवेटेड एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा 'आरआरआर' (RRR) हा चित्रपट रिलीज होण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा चित्रपट बनवला जात आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!
ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते 'अल्लुरी सीताराम राजू' आणि 'कोमाराम भीम कोण होते?
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 12:05 PM

मुंबई : यावर्षीचा मोस्ट अवेटेड एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट रिलीज होण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा चित्रपट बनवला जात आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘बाहुबली’च्या दमदार यशानंतर राजामौलींकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा दुपटीने वाढल्या आहेत. राजामौली यांच्या चित्रपटाचे आतापर्यंतचे पोस्टर्स आणि व्हिडीओज पाहता राजामौली यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या जात आहेत, त्या अगदी रास्त असल्याचे दिसते.

आता ‘आरआरआर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. तो अमेरिकेत विक्रमी रिलीज होण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंकव्हिलामध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, Jr NTR आणि राम चरण स्टारर हा चित्रपट अमेरिकेत रिलीज होणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट अमेरिकेतील जवळपास 999 मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होणारा हा चित्रपट पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे. आजपर्यंत कोणत्याही हिंदी किंवा अन्य भाषेतील चित्रपटाला एवढा मोठा रिलीज झाला नव्हता.

अमेरिकेतील 999 मल्टिप्लेक्समध्ये रिलीज करण्याची तयारी!

ट्रेड सोर्सच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट प्रत्येक विभागात आणि प्रत्येक देशात नेण्याची तयारी केली आहे. ‘बाहुबली’च्या यशानंतर राजामौली हे एक ब्रँड बनले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या सिनेमाची वाट पाहत आहे. व्यापारिक सूत्रांच्या मते,  निर्माते चित्रपटाला अमेरिकेतील जवळपास 999 मल्टिप्लेक्स आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात असा कोणताही भारतीय चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झालेला नाही.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट!

राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीजही जाहीर झाला आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी ट्रेलर रिलीज करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. तर अजय देवगण आणि आलिया भट्ट या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारतात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याची रिलीज डेट 7 जानेवारी 2022 ठेवण्यात आली आहे. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाविषयी बरीच चर्चा आहे.

हेही वाचा :

Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.