Nora Fatehi | क्रॉप टॉप आणि शॉर्ट्सवर नोरा फतेहीने केला जबरदस्त डान्स
सुकेश प्रकरणात नोराची चाैकशीही करण्यात आलीये. नोराचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर नोराच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसलाय.

मुंबई : नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या अभिनयामुळे आणि डान्समुळे कायमच चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नोरा एका वेगळ्याच प्रकरणामुळे अडचणीत सापडलीये. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीचे देखील नाव आले. इतकेच नाही तर नोराला सुकेशने महागडे गिफ्ट (Gift) दिल्याचे देखील सांगण्यात आलंय. सुकेश प्रकरणात नोराची चाैकशीही करण्यात आलीये. नोराचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यानंतर नोराच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. मात्र, सर्व वाद सुरू असताना देखील नोरा सोशल मीडियावर (Social media) सक्रिय आहे.
इथे पाहा नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ
View this post on Instagram
नोराचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नोरा एका बीचवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नोराचा बोल्ड लूक दिसतोय. विशेष म्हणजे नोरानेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नोराच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नोराने गुलाबी रंगाच्या क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स घातलेली आहे.
नोरा फतेहीच्या किलर डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. नोराने हा डान्स समुद्रकिनारी केला आहे. नोराच्या या डान्स व्हिडीओला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट करत आहेत. नोरा फतेही अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत थँक गॉड या चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगणचा हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. इतकेच नव्हे तर चित्रपटावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये.
