Bollywood Movies | कधी काळी शाहरुख खानने नाकारले होते ‘हे’ चित्रपट, पुढे ठरले सुपर डुपर हिट!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 9:00 AM

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने DDLJ, कुछ कुछ होता है अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून तीन दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. आजही प्रत्येकजण शाहरुखच्या रोमँटिक शैलीचे चाहते आहेत.

Bollywood Movies | कधी काळी शाहरुख खानने नाकारले होते ‘हे’ चित्रपट, पुढे ठरले सुपर डुपर हिट!
शाहरुख खान
Follow us

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने DDLJ, कुछ कुछ होता है अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून तीन दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. आजही प्रत्येकजण शाहरुखच्या रोमँटिक शैलीचे चाहते आहेत. चित्रपट जगतातील एक मोठे नाव असलेल्या शाहरुख खानने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली आहेत.

पण, तुम्हाला माहीत आहे का की, शाहरुखने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या काही चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. चला तर मग जाणून घेऊया किंग खानने नाकारलेल्या अशा काही ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल…

स्लमडॉग मिलिनियर

ऑस्कर नामांकित चित्रपट स्लमडॉग मिलियनेअरमध्ये अनिल कपूरने साकारलेल्या क्विझ शो होस्टची भूमिका यापूर्वी शाहरुख खानला देण्यात आली होती. मात्र, अभिनेत्याने भूमिका करण्यास नकार दिला. याबद्दल शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी ही भूमिका केली नाही, तो कारण होस्ट फसवा आणि थोडा वाईट होता. आणि मी असा शो केला आहे, मग लोकांना वाटेल की, मीही असेच काही केले असावे.”

मुन्नाभाई एमबीबीएस

संजय दत्तच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मुन्नाभाई एमबीबीएससाठी शाहरुख खानला प्रथम संपर्क करण्यात आला. तथापि, अभिनेत्याने यासाठी नकार दिला. विशेष म्हणजे त्यावेळी संजय दत्तला या चित्रपटासाठी जिमी शेरगिलची भूमिका ऑफर करण्यात आली होती.

लगान

आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘लगान’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात भुवनच्या भूमिकेसाठी आधी शाहरुख खानची निवड झाली होती, पण त्याने ही भूमिका नाकारली. वास्तविक, या भूमिकेसाठी हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन देखील विचाराधीन होते. पण, नंतर आमिर खानची यासाठी निवड झाली.

जोधा अकबर

‘स्वदेश’नंतर ‘जोधा अकबर’ या चित्रपटासाठी आशुतोष गोवारीकरला शाहरुख खानसोबत पुन्हा एकत्र काम करायचे होते, पण अभिनेत्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला, त्यानंतर हृतिक रोशनने हा ऐतिहासिक चित्रपट केला.

एक था टायगर

कबीर खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट ‘एक था टायगर’ हा सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. मात्र, या चित्रपटासाठी सर्वप्रथम शाहरुख खानशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, पण तारखांमधील अडचणींमुळे त्याला हा चित्रपट सोडावा लागला.

(Once upon a time Shah Rukh Khan had rejected these movies which turned out to be a super-duper hit)

हेही वाचा :

‘Bella Ciao’चा ताल अन् डालीच्या वेशात कोरोना लस घेण्याचं आवाहन, पुण्याच्या रस्त्यावर दिसणारे ‘ते’ नेमके कोण?

ऋषी कपूर यांच्या ‘शर्माजी नमकीन’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, लाडक्या अभिनेत्याला पाहून चाहते झाले भावूक!

‘रोमान्स किंग’ शाहरुख खान पुण्यात, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI