hone Bhoot | ‘फोन भूत’मधील किन्ना सोना गाण्याचा टीझर रिलीज, पाहा व्हिडीओ
फोन भूत चित्रपटातील गाण्याचे टीझर निर्मात्यांनी नुकताच रिलीज केले असून प्रचंड प्रतिसाद याला मिळतोय. थोड्यात काय तर चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षाही गाण्याचे टीझर प्रेक्षकांना आवडले आहे.

मुंबई : कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट फोन भूत (Phone Bhoot) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. मात्र, चाहत्यांमध्ये असलेली चित्रपटाची क्रेझ कमी न होऊ देण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील (Movie) एका खास गाण्याचे टीझर रिलीज केले असून हे गाण्याचे टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कतरिना कैफच्या (Katrina Kaif) गाण्याचे हे टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडले.
इथे पाहा गाण्याचा टीझर व्हिडीओ
फोन भूत चित्रपटातील गाण्याचे टीझर निर्मात्यांनी नुकताच रिलीज केले असून प्रचंड प्रतिसाद याला मिळतोय. थोड्यात काय तर चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षाही गाण्याचे टीझर प्रेक्षकांना आवडले आहे. या टीझरमध्ये कतरिना जबरदस्त असा डान्स करताना दिसत आहे. यंदाच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट हॉरर कॉमेडी चित्रपट हाच ठरणार असल्याचे सांगितले जातंय. गाण्याच्या टीझरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
फोन भूतमधील ‘किन्ना सोना’ या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज केलाय. विशेष म्हणजे या गाण्यात तिन्ही लीड स्टार्स दिसत आहेत. या गाण्यात कतरिनाचा हॉट लूक दिसतोय. चाहते आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कतरिना कैफचा हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी सोनाक्षी सिन्हाचा डबल एक्सएल हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बाॅक्स आॅफिसवर डबल एक्सएल की फोन भूत हीट ठरतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होईल हे नक्कीच.
