AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prabhu Deva Birthday Special : आज प्रभू देवा यांचा 49वा वाढदिवस, यानिमित्त जाणून घ्या काही खास गोष्टी, आयुष्यातील वादळं आणि बरेच काही

आज प्रभू देवा त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रभू देवा त्यांच्या किलर डान्स मूव्हसाठी ओळखले जातात. लहानपणापासूनच त्यांच्या आत नृत्याचा किडा होता. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक आणि उत्कृष्ट अभिनेत्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या जीवनाशी निगडित काही खास गोष्टी.

Prabhu Deva Birthday Special :  आज प्रभू देवा यांचा 49वा वाढदिवस, यानिमित्त जाणून घ्या काही खास गोष्टी, आयुष्यातील वादळं आणि बरेच काही
प्रभू देवा Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 7:01 AM
Share

मुंबई : भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते प्रभू देवा (prabhu deva birthday special) यांचा आज वाढदिवस. भारताचे मायकल जॅक्सन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवा (prabhu deva) यांनी आपल्या कामाने चित्रपटसृष्टीत खोलवर छाप सोडली आहे. 100 हून अधिक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या प्रभू देवा यांना त्यांच्या वडिलांकडून नृत्याची प्रेरणा मिळाली. प्रभू देवाचे वडील आणि दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेंद्र हे देखील डान्स कोरियोग्राफर आहेत. 1994मध्ये उर्वशी या गाण्याने आपल्या करिअरची सुरुवात करणारे प्रभू देवा आज एक प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत प्रभू देवा यांचा दबदबा आहे. आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना 2019 मध्ये पद्मश्री देखील मिळाला आहे. आज प्रभुदेवा त्यांचा 49 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या जीवनाशी निगडीत काही खास गोष्टी जाणून घेऊया.

प्रभू देवांची खास नृत्यशैली

प्रभू देवा यांचे नाणे देश-विदेशात सर्वत्र चालते असं बोललं जातं. प्रभू देवा हा एकमेव व्यक्ती आहे ज्याने सलमान खानच्या करिअरला एका उंचीवर नेलंय. त्यांनी 2009 मध्ये ‘वॉन्टेड’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. सलमानशिवाय, प्रभू देवा यांनी अक्षयसोबत राऊडी राठौर आणि शाहिदसोबत राजकुमार असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या किलर डान्स स्टेप्स आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यासह सलमानच्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शक असलेले प्रभू देवा नेहमीच गोंधळात राहिले आहेत. एकीकडे ते यशाच्या शिखराला स्पर्श करत राहिले तर दुसरीकडे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यानेही त्रस्त होते. 1995मध्ये त्यांनी रामलतासोबत लग्न केले. लता आणि प्रभू यांना तीन मुले होती. त्यापैकी एका मुलाचा 2008 मध्ये कॅन्सरनं मृत्यू झाला होता.

लता यांचं खूप प्रेम होतं

लता यांचं प्रभू देवा यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी प्रभू देवा यांच्यासोबत अनेकदा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, आपलं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते होऊ शकलं नाही. त्यादरम्यान लता या नात्यावर सतत मीडियाशी बोलत होत्या. त्यानंतर लता यांनी सांगितलं की ,नयनताराने तिला फोन केला होता आणि प्रभुदेवाकडे दुसरे लग्न करण्याची परवानगी मागितली होती. नयनताराने प्रभुदेवाशी लग्न करण्यासाठी लता तीन कोटी रुपये, सोन्याची काही नाणी आणि 85 लाखांचा हार भेट दिल्याचेही त्यावेळी बातमी होती. त्यानंतर काही गोष्टी उघड झाल्या होत्या. नयनतारा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि ते तिच्याशी लग्न करणार आहे, अशी वक्तव्ये खुद्द प्रभू देवा यांनी मीडियामध्ये द्यायला सुरुवात केली होती. मात्र, त्यांच्या आयुष्यात असे काही वळनं आले की ते दोघे वेगळे झाले आणि 2015 मध्ये नयनताराने विघ्नेश शिवनशी लग्न केलं. प्रभू देवा यांच्या जीवनाशी निगडित या काही गोष्टी आम्ही तुम्हाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितल्या. आज प्रभुदेवा त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांना शुभेच्छा.

इतर बातम्या

Sandalwood Smuggler : भोर तालुक्यात नदीपात्रात आढळले चंदनाचे ओंडके, पोलिसांकडून भोरच्या पुष्पाचा शोध सुरू

03 April 2022 Panchang | 03 एप्रिल 2022, रविवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

सावधान…! मधुमेहामुळे डोळ्यांचे होऊ शकतात गंभीर विकार या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या डाॅक्टरांचे मार्गदर्शन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.