Rakhi Sawant Biopic | आलिया की प्रियंका, कोण साकारेल राखीची भूमिका? ‘ड्रामा क्वीन’ने दिले उत्तर…

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने नुकतेच आपला बयोपिक बनणार असल्याचे सांगत, सर्वांना चकित केले होते.

Rakhi Sawant Biopic | आलिया की प्रियंका, कोण साकारेल राखीची भूमिका? ‘ड्रामा क्वीन’ने दिले उत्तर...
राखी सावंत

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने नुकतेच आपला बयोपिक बनणार असल्याचे सांगत, सर्वांना चकित केले होते. ज्येष्ठ गीतकार लेखक जावेद अख्तर यांना तिचा बायोपिक चित्रपट बनवायचा आहे, असे राखी म्हणाली होती. इतकेच नाही तर, नंतर जावेद अख्तर यांनी राखीचे विधान खरे असल्याची पुष्टी केली. आता राखी सावंतने सांगितले आहे की, जावेद अख्तर यांच्यासोबत तिचे काय-काय बोलणे झाले आणि तिला या चित्रपटात स्वतःची भूमिका कोणत्या अभिनेत्रीने साकारायला हवी, यासाठी राखीने पर्याय देखील सुचवले आहेत (Rakhi Sawant Biopic Which actress will play rakhi in her biopic actress gives an options).

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना राखी सावंत म्हणाली, ‘काही वर्षांपूर्वी आम्ही एकत्र प्रवास करत होतो आणि एका विमानात भेटलो होतो. जावेद सर मला म्हणाले की, त्यांना माझ्या जीवनावर बायोपिक लिहायचा आहे, ते मी कसा संघर्ष केला आणि इथपर्यंत पोहचले त्यावर लिहिणार आहेत. परंतु, नंतर ते आपल्या उर्वरित प्रकल्पांमध्ये व्यस्त झाले आणि त्यानंतर आम्ही भेटलो नाही.’ राखी म्हणाली, ‘आता मला वाटतं त्यांना वेळ मिळाला आहे आणि जर त्यांना काही वेळ मिळाला असेल, तर ते नक्कीच ही कथा लिहीतील.’

पाहा राखीचा नवा व्हिडीओ

(Rakhi Sawant Biopic Which actress will play rakhi in her biopic actress gives an options)

बायोपिकमध्ये राखीची भूमिका कोण करणार?

हा प्रश्न विचारल्यावर राखी सावंत म्हणाली, ‘मला असे वाटते की माझ्या भूमिकेला न्याय मिळवून देणाऱ्या 2-3 अभिनेत्री आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट हिचा यात पहिला क्रमांक आहे. मला वाटते ती हुशार आहे. ती बोल्ड आणि मस्त आहे आणि ती कोणालाही घाबरत नाही. मला असं वाटतं की, माझी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्रीमध्ये माझ्यासारखे हे गुण असलेच पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त प्रियंका चोप्रा देखील मला या भूमिकेसाठी योग्य वाटते. ती माझी भूमिका साकारू शकते (Rakhi Sawant Biopic Which actress will play rakhi in her biopic actress gives an options).

राधिका आपटेचेही नाव चर्चेत!

राखीने अभिनेत्री राधिका आपटे ही देखील स्वतःचे पात्र साकारण्यासाठी योग्य ठरेल असे म्हटले आहे. ती म्हणाली, ‘राधिका आणि प्रियांका दोघेही बिनधास्त आहेत आणि माझी भूमिका करण्यासाठी त्यांच्यात स्पार्क आहे. मी बर्‍याच चढउतारांमधून गेले पण कोणालाही माझ्या सन्मानापेक्षा वरचढ होऊ दिले नाही. मी अनेक लक्ष्मण रेषा ओलांडल्या आहेत आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बर्‍याच शिताफिने हाताळली आहे.’

‘बिग बॉस 14’च्या घराचा भाग बनलेली राखी सावंतने शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर तिने 14 लाख रुपये घेऊन घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. नंतर तिने आपल्या आईची तब्येत कशी खराब आहे, आणि आपल्याला पैशाची अत्यंत निकड होती, हे सांगितले.

(Rakhi Sawant Biopic Which actress will play rakhi in her biopic actress gives an options)

हेही वाचा :

PHOTO | कियारा अडवाणीच्या बोल्ड लूकने चाहते झाले घायाळ! म्हणाले…

Rhea Chakraborty | ‘चेहरे’मध्ये रिया चक्रवर्ती दिसणार की नाही? निर्मात्याने दिले ‘हे’ उत्तर!

Published On - 2:21 pm, Wed, 17 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI