AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan | पठाण चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज, शाहरुख खान याचा नवा दमदार लूक पाहा

आता पठाण या चित्रपटातून शाहरुख खान पुन्हा एकदा दणदणीत पुनरागमन करणार आहे.

Pathaan | पठाण चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज, शाहरुख खान याचा नवा दमदार लूक पाहा
| Updated on: Dec 06, 2022 | 9:09 PM
Share

मुंबई : शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. 2018 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर शाहरुख मोठ्या पडद्यापासून दूर होता. आता पठाण या चित्रपटातून शाहरुख खान पुन्हा एकदा दणदणीत पुनरागमन करणार आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पठाण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होईल. 2023 मध्ये त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच डंकीच्या शूटिंगच्या ठिकाणावरून त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

2023 मध्ये शाहरुख खान याचे लागोपाठ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामुळे 2023 हे वर्ष शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी स्पेशल राहणार हे नक्की. जवान चित्रपटामध्ये शाहरुख खान वेगळ्या भूमिकेत असणार आहे.

नुकताच सोशल मीडियावर शाहरुख खानच्या आगामी पठाण या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख खानचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. यापूर्वी पठाण या चित्रपटाचे टीझरही रिलीज करण्यात आले आहे.

रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शाहरुख खान याच्या हातामध्ये बंदूक दिसत असून त्याचे केस बांधलेले दिसत आहेत. शाहरुख खानचा हा लूक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

सोशल मीडियावर आता पठाण चित्रपटाचे हे पोस्टर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टरवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून शाहरुख खानच्या लूकची तारीफ करताना दिसत आहेत.

पठाण हा चित्रपट 2023 मध्ये 25 जानेवारीला रिलीज होणार असून हा चित्रपट 2023 मधील सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट असल्याचे सांगितले जातंय. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरेल, अशा अपेक्षा अनेकांना आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.