Uorfi Javed | उर्फी जावेद’ने या महिलेला दिले ओपन चॅलेंज, म्हणाली की…
नुकताच उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ तिने शबनम शेख नावाच्या महिलेचे शेअर केले आहेत.

मुंबई : उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फीला तिच्या हटके स्टाईलमुळे एक वेगळी ओळख मिळालीये. मात्र, विचित्र कपड्यांमुळे तिच्यावर टीकाही केली जाते. परंतू उर्फी अशा टीका करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर कायमच देते. काही लोकांना उर्फीचे कपडे आवडत नाही तर काही लोक बऱ्याच वेळा उर्फीचे समर्थन करताना देखील दिसतात. काही दिवसांपूर्वी कश्मीरा शाह हिने उर्फीवर जोरदार टीका केली होती.
नुकताच उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ तिने शबनम शेख नावाच्या महिलेचे शेअर केले आहेत. इतकेच नाही तर यावर उर्फीने देखील एक व्हिडीओ तयार करून शेअर केला आहे. या महिलेवर उर्फीने जोरदार टीका केलीये.
उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शबनम शेख उर्फीच्या विरोधात बरेच काही बोलताना दिसत आहे. शबनम शेख उर्फीच्या कपड्यांवरून तिला टार्गेट करत आहे. उर्फीचे कपडे हे येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे व्हिडीओमध्ये शबनम शेखने म्हटले आहे.
शबनम शेखला उत्तर देताना उर्फी म्हणाली की, या महिलेने मला काही दिवसांपूर्वी मदत मागण्यासाठी काॅल केला होता. पण मी हिची मदत करू शकले नाही. तेंव्हापासून ही मला माझ्या विरोधात सातत्याने बोलत आहे. अशा महिले विरोधात गुन्हा नोंद करायला हवा.
सबनम शेखने बोलताना उर्फी जावेदच्या कानाखाली मारण्याची देखील भाषा केलीये. यावर उर्फी म्हणाली की, मी तुला ओपन चॅलेंज देते…तू फक्त माझ्या कानाखाली मारून दाखव…आता यावर सबनम शेख काय प्रतिक्रिया देते हे बघण्यासारखे ठरणार आहे.
