AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा गौप्यस्फोट, म्हणाले, भारतीय महिला इराक आणि सीरियामध्ये…

'द केरळ स्टोरी हा नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. अगोदर चित्रपटाला मोठा विरोध होताना दिसत होता. अनेकांनी चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली होती. हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे.

'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा गौप्यस्फोट, म्हणाले, भारतीय महिला इराक आणि सीरियामध्ये...
| Updated on: May 06, 2023 | 8:03 PM
Share

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद बघायला मिळाला. मात्र, दुसरीकडे आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या (Movie) विरोधात अनेकांनी थेट कोर्टात धाव घेतली होती. इतकेच नाही तर सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, शेवटी मोठ्या वादानंतर चित्रपट 5 मेला रिलीज झाला. हा चित्रपट काल रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाकेदार ओपनिंग केलीये. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द देखील करण्यात आले आहेत.

द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या जबरदस्त ओपनिंगनंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी वादावर माैन सोडत अत्यंत मोठे भाष्य केले आहे. लोकांचा प्रतिसाद चित्रपटाला मिळताना पाहून सुदीप्तो सेन यांनी काही मोठे खुलासे देखील केले आहेत.

सुदीप्तो सेन म्हणाले की, मी या विषयावर द कश्मीर फाईल्सच्या अगोदरपासून काम करायला सुरुवात केली होती. लोक माझ्या चित्रपटाबद्दल बोलत असताना कश्मीर फाईल्स चित्रपटाला का आणतात हे मला कळत नाही. तुम्ही माझ्याशी सहमत असाल की नाही मला माहिती नाही पण द कश्मीर फाईल्सने भारतातील लोकांना हादरवून सोडले. माझा चित्रपट वेगळा नक्कीच आहे. मुळात म्हणजे माझ्या चित्रपटाची स्टोरी देखील खूप वेगळी आहे.

सुदिप्तो सेन पुढे म्हणाले, मी या विषयावर तब्बल सात वर्ष अभ्यास केला. त्याचबरोबर जगभरातून शेकडो कागदपत्रे आम्ही जमा केली आहेत. द केरळ स्टोरीने 32,000 भारतीय महिला ISIS च्या तावडीत अडकल्या आहेत आणि त्यांना भारतातून आमिष दाखवून इराक आणि सीरियामध्ये पाठवले आहे, असेही यावेळी बोलताना सुदिप्तो सेन म्हणाले आहेत.

मुळात म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाला रिलीजच्या अगोदर मोठा विरोध होताना दिसत होता. मात्र, आता चित्र वेगळे बघायला मिळत आहे. अनेकजण द केरळ स्टोरी या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत असून चित्रपटाच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर देखील करत आहेत. चित्रपट धमाका करताना दिसतोय.

Follow Us
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा...
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा....
मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर
मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर.
पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का?
पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का?.
महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या
महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या.
अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका
अर्ज भरला, पण आता अडथळा! विक्रम काकडेंना निवडणुकीआधीच मोठा झटका.
अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
अपात्र महिलांकडून पैसे वसूल होणार का? फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर.
मोठी बातमी! शिंदे गटातील नाराज अब्दुल सत्तार यांची उबाठाच्या अंबादास द
मोठी बातमी! शिंदे गटातील नाराज अब्दुल सत्तार यांची उबाठाच्या अंबादास द.
सरकारी तिजोरीचा अपहार? राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं
सरकारी तिजोरीचा अपहार? राऊतांच्या वक्तव्याने राजकारण ढवळून निघालं.
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांन
सावधान! मोठ्या Gold Scam चा पर्दाफाश, सोनाराकडून भयंकर कांड, 133 जणांन.
लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलं? बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज!
लाडकी बहीण योजनेतून नाव वगळलं? बावनकुळेंनी दिली मोठी गुड न्यूज!.