Sushant Singh Rajput | शेती करण्यापासून ते कैलासात ध्यानधारणा करण्यापर्यंत, वाचा सुशांतच्या ‘अधुऱ्या’ स्वप्नांची यादी!

Sushant Dreams | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी निधन झाले. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांत एक असा कलाकार होता, जो खूप स्वप्न पाहायचा आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्नही करायचा.

Sushant Singh Rajput | शेती करण्यापासून ते कैलासात ध्यानधारणा करण्यापर्यंत, वाचा सुशांतच्या ‘अधुऱ्या’ स्वप्नांची यादी!
सुशांत सिंह राजपूत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी निधन झाले. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांत एक असा कलाकार होता, जो खूप स्वप्न पाहायचा आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्नही करायचा. पण, सुशांतच्या अशा अचानक निघून जाण्याने त्याची अनेक स्वप्नेही अधुरी राहिली आहेत (Sushant Singh Rajput forever incomplete 50 dreams list).

सुशांतच्या मृत्यूला आता एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण अभिनेत्याचे कुटुंबिय, जवळचे मित्र आणि चाहते अद्याप या दु:खातून बाहेर आले नाहीत. चाहते दररोज त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर करत असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे सुशांतच्या स्वप्नांची यादी. एकदा सुशांतने स्वत: चाहत्यांना त्याच्या 50 स्वप्नांची माहिती दिली होती. त्याने स्वतः आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली होती (50 Dreams of Sushant Singh Rajput). याबाबत त्याने 14 सप्टेंबर 2016 रोजी स्वतः ट्विट करत आपल्या 50 स्वप्नांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्याने 12 स्वप्नांना गवसणी घालून 38 स्वप्नं अपूर्ण ठेवत निरोप घेतला.

काही स्वप्न पूर्ण तर काही राहिली अधुरी…

सुशांत सिंह राजपूतने केवळ 50 स्वप्नं पाहिलीच नाही, तर त्यातील अनेक स्वप्न पूर्ण देखील केली. त्याने आपल्या 50 स्वप्नांपैकी जवळपास 12 स्वप्नं पूर्ण केली. जेव्हा जेव्हा त्याने आपलं स्वप्न पूर्ण केलं, तेव्हा त्याने ट्विटरवर याची माहिती देत ट्विट केलं. या प्रत्येक ट्विटमध्ये त्याने माझी स्वप्नं जगत आहे (#LivingMyDreams) आणि माझ्या स्वप्नांवर प्रेम करत आहे (#LovingMyDreams) हॅशटॅगही वापरले.

सुशांतने आपल्या यादीत प्रवास, खेळ, साहस, कौशल्ये, सामाजिक काम, जुन्या ठिकाणांना भेटी अशा अनेक प्रकारच्या स्वप्नांचा आपल्या यादीत समावेश केला होता.

  • यात त्याचं पहिलंच स्वप्न विमान कसं चालवायचं हे शिकण्याचं होतं.
  • त्याचं दुसरं स्वप्न जागतिक दर्जाच्या ‘आयर्नमॅन ट्रायथॅलॉन’ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचं होतं. ही जगातील सर्वाधिक कठीण मॅरेथॉन समजली जाते. यात एकाच वेळी एकामागोमाग पोहवं, सायकल चालवावं आणि पळावं लागतं. त्याने आपल्या यादीतील ही दोन्ही स्वप्न पूर्ण केली होती.
  • सुशांत मुळात उजवा होता. मात्र, त्याला डावखुऱ्या फलंदाजाप्रमाणे क्रिकेट खेळायचं होतं. हे त्याचं तिसरं स्वप्न होतं. यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांचा समावेश होता. त्याने आपलं हेही स्वप्न पूर्ण केलं.
  • त्याला समुद्रातील ब्लू होलमध्ये देखील पोहायचं होतं. त्याने आपलं ते स्वप्न देखील पूर्ण केलं.
  • यानंतर त्याने थेट आपलं बारावं स्वप्न पूर्ण केलं. हे स्वप्न होतं त्याचं जुनं कॉलेज असलेल्या दिल्ली तांत्रिक विद्यापीठाला (दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) भेट द्यायचं. याप्रमाणे त्याने एक दिवस अचानक कॉलेजला भेट दिली. यावेळी त्याने कॉलेजच्या लायब्ररीला भेट दिली, कॅन्टीनमध्ये बर्गर खाल्ल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत सेल्फी देखील काढले (Sushant Singh Rajput forever incomplete 50 dreams list).

पाहा सुशांतच्या स्वप्नांची यादी :

सुशांत चित्रपटात काम करत असला तरी देखील त्याला तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन याची मोठी गोडी होती. त्यामुळेच त्याने गॉड पार्टिकलसह अनेक मोठे शोध लावलेल्या लार्ज हॅड्रोन कॉलायडरलाही भेट दिली होती. येथे उर्जा कणांची टक्कर घडवून आणण्यासाठी बनवलेले जगातील सर्वात मोठे मशिन आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली. मात्र, त्याने त्यातील केवळ 12 स्वप्नं पूर्ण केली. उर्वरीत 38 स्वप्नं पाहण्याआधीच त्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. त्याने आपल्या स्वप्नांपैकी शेवटचं स्वप्न 15 ऑक्टोबर 2019 रोजी पूर्ण केलं होतं. त्यानंतर मात्र, त्याने या 50 स्वप्नांच्या यादीतील स्वप्नं पूर्ण करण्याविषयी ट्विट केलं नाही.

(Sushant Singh Rajput forever incomplete 50 dreams list)

हेही वाचा :

अभिनेत्री हनिया आमीरच्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याचे घृणास्पद कृत्य, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Video | अल्लू अर्जुनच्या गाण्यावर कार्तिक आर्यनचा धमाल डान्स, व्हिडीओ पाहून बॉलिवूडकरही अवाक्!