Revealed : 2024मध्ये सुशांत सिंह राजपूत चंद्र मोहिमेवर जाणार होता, बहीण श्वेता सिंह कीर्तीचा दावा

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची बहीण श्वेता सिंह कीर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने खुलासा केला आहे की तिचा भाऊ आणि अभिनेता सुशांत 2024 मध्ये मार्स मिशनवर जाणार होता.

Revealed : 2024मध्ये सुशांत सिंह राजपूत चंद्र मोहिमेवर जाणार होता, बहीण श्वेता सिंह कीर्तीचा दावा
सुशांत सिंह राजपूत

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची बहीण श्वेता सिंह कीर्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने खुलासा केला आहे की तिचा भाऊ आणि अभिनेता सुशांत 2024 मध्ये मून मिशनवर जाणार होता. सुशांत सिंह राजपूतला विज्ञान किती आवडायचे हे त्याच्या सर्व चाहत्यांना माहित आहे. त्याने आपल्या एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, जर तो अभिनेता नसता तर तो नक्कीच अंतराळवीर झाला असता.

मात्र, श्वेता सिंह कीर्तीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुशांत सिंह राजपूतचा स्पेस सूटमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने लिहिले, ‘जगातील एकमेव अभिनेता ज्याने नासाकडून अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेतले आणि इतकेच नव्हे तर, तो 2024 मध्ये चंद्र मोहिमेवर जाण्यासाठी तयार झाला. तो होता- सुशांत सिंह राजपूत. आमचा अभिमान सुशांत.’

पाहा पोस्ट :

श्वेताच्या या पोस्टवर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांसह त्याच्या जवळच्या मित्रांकडून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की जेव्हा सुशांत मंगळ मोहिमेवर जात असल्याची चर्चा समोर आली, तेव्हा आम्ही त्याला मंगळावर प्रवास करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक झालो होतो.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत खूप हुशार व्यक्ती होता, यात काही शंकाच नाही. सुशांत सिंह राजपूतशी संबंधित प्रत्येकजणाला हे माहित होते की, अभिनेता आपल्या कारकिर्दीत मोठ्या पडद्यावर चमकण्यासाठी किती तयारी करायचा. सुशांत त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘चंदा मामा दूर के’ बद्दल इतका उत्साही झाला होता की, तो त्यासाठी मेहनत घेत होता. सुशांत सिंह राजपूत यांने एकदा अंतराळवीरांच्या जीवनाचे सखोल दर्शन घेण्यासाठी राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन (नासा) कार्यालयात भेट दिली होती.

सुशांतने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, मला नेहमीच नासा येथे जायचे होते. मी तिथे गेलो आणि अंतराळवीर म्हणून केले जाणारे सर्व काही प्रशिक्षण घेतले. चित्रपटाला पूर्ण विराम मिळाला असला तरी सुशांत सिंह राजपूत पुन्हा नासा येथे गेला आणि तेथे त्याने प्रशिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले. सुशांतच्या निधनानंतर दिग्दर्शक संजय पूरण सिंह म्हणाले होते की, सुशांत आता या चित्रपटात नसेल पण हा चित्रपट नक्कीच बनणार आहे. हा चित्रपट सुशांतला श्रद्धांजली ठरेल.

(Sushant Singh rajput was to go on Moon mission in 2024)

हेही वाचा :

Neha Dhupia Pregnant : नेहा धुपियाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’, लवकरच करणार दुसऱ्या बाळाचे स्वागत!

Rakhi Sawant Video : राहुल वैद्य आणि दिशाच्या लग्नाची धूम, राखी सावंत म्हणते ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं हं’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI