Antim : The Final Truth : ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गणपती उत्सवानिमित्त ‘विघ्नहर्ता’ प्रदर्शित

'विघ्नहर्ता' हे गाणं आता रिलीज झालं आहे. हे गाणे गणपती उत्सवानिमित्त रिलीज करण्यात आलं. गाण्यात वरूण धवन, सलमान खान आणि आयुष शर्मा गणपती पूजेच्या निमित्तानं एकत्र नाचताना दिसत आहेत. (The first song of 'Final: The Final Truth' is released for audience on the occasion of Ganpati Utsav.)

Antim : The Final Truth : 'अंतिम: द फायनल ट्रुथ'चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गणपती उत्सवानिमित्त 'विघ्नहर्ता' प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood Actor Salman Khan) आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा (Ayush Sharma) स्टारर चित्रपट ‘Antim: The Final Truth’ चं पहिलं गाणं ‘विघ्नहर्ता’ (Vighnharta) रिलीज झालं आहे. हे गाणे गणपती उत्सवानिमित्त रिलीज करण्यात आलं आहे. गाण्यात वरूण धवन, सलमान खान आणि आयुष शर्मा गणपती पूजेच्या निमित्तानं एकत्र नाचताना दिसत आहेत. गाण्याचं सुंदर चित्रीकरण करण्यात आलं आहे. गाण्याची सुरुवात एका प्रचंड गणपतीच्या मूर्तीपासून होते. मूर्तीसमोर वरुण धवन गणपतीची आरती करत आहे.

‘विघ्नहर्ता’ (Antim First Song) गाण्याच्या मध्ये, सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दाखवला आहे. त्याचवेळी आयुष शर्मा कोणावर तरी गोळ्या झाडताना दिसत आहे. नंतर दोघंही गणपतीच्या पंडपात येतात आणि गणपतीची आरती करतात आणि वरूण धवनसोबत डान्स करतात. आयुष आणि वरुणच्या सर्वोत्कृष्ट नृत्याच्या चाली देखील गाण्यात दिसतात. ‘विघ्नहर्ता’ गाण्याचे टोन आणि व्हिज्युअल्स खूपच सुंदर आहेत. हे गाणं भक्तिमय रंग आणि वातावरणात रचलेलं आहे, जे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल आणि त्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करेल.

सलमान खान आणि आयुष शर्मा केलं शेअर

सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘विघ्नहर्ता’ हे गाणं शेअर करताना लिहिलं, ‘बाप्पाच्या आशीर्वादानं अंतिम फेरीची सुरुवात.’ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर गाणं शेअर करताना आयुष शर्मा यांनी लिहिलं, “विघ्नहर्ता गाणं आलं आहे…. बाप्पाच्या आशीर्वादानं, गणपती बाप्पा मौर्या, अंतिमला सुरुवात होईल. ”

पाहा आयुष शर्माची खास पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

‘विघ्नहर्ता’ हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे. याचं संगीत हितेश मोडक यांनी दिलं आहे. वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल अतिशय सुंदर लिहिले आहेत.सलमान खान फिल्म्स प्रस्तुत ‘अँटीम: द फायनल ट्रुथ’ सादर करत आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमा खान यांनी केली आहे.

संपूर्ण ट्रॅक झाला रिलीज

‘विघ्नहर्ता’च्या टीजरने दर्शक आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता, संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे आणि याला मिळणारा दर्शक आणि चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ची हाय-ऑन एनर्जी फेस्टिव डांस ट्रॅकमध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि वरुण धवन असणार आहेत. टीजरला दर्शकांसाठी प्रदर्शित केल्यानंतर, याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या चाहत्यांकडून याचे भव्य स्वागत होत आहे. या ट्रॅकमध्ये वरुण आणि आयुष यांच्या ऊर्जावान डांस स्टेप्स असून कानसेनांसाठी एक कर्णमधुर पर्वणी आहे.

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीला कॅरी करा स्टायलिश एथनिक कपडे, होईल कौतुकाचा वर्षाव

Urfi : ब्रा फ्लॉन्ट केल्यानंतर उर्फी जावेदला हिजाब परिधान करण्याचा सल्ला; म्हणाली, ‘मी फक्त मुस्लिम आहे म्हणून मला ट्रोल करताय?’

‘गणपती बाप्पा’ची मूर्ती आणायला शिल्पा शेट्टी एकटीच रवाना, राज कुंद्रा नाही तर, लेक वियानने केलं बाप्पाचं स्वागत!

Bigg Boss OTT : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेदने ट्यूब टॉपमध्ये दाखवला बोल्ड अवतार, चाहते घायाळ

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI