AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mithilesh Chaturvedi: ‘कोई मिल गया’मधील अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; सलमान-हृतिकसह अनेक बड्या कलाकारांसह केलं होतं काम

मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये 'भाई भाई' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ते 'सत्या', 'ताल', 'फिजा', 'रोड', 'कोई मिल गया', 'बंटी और बबली', 'क्रिश' आणि 'गांधी माय फादर' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकले.

Mithilesh Chaturvedi: 'कोई मिल गया'मधील अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; सलमान-हृतिकसह अनेक बड्या कलाकारांसह केलं होतं काम
Mithilesh Chaturvedi: 'कोई मिल गया'मधील अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधनImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 11:37 AM
Share

बॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचं निधन झालं आहे. मिथिलेश यांनी 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनौमध्ये (Lucknow) अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या (Heart Problems) होत्या. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते त्यांच्या मूळगावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील. मिथिलेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

मिथिलेश चतुर्वेदी यांच्यासोबत ‘क्रेझी 4’ आणि ‘कोई मिल गया’ या चित्रपटांमध्ये काम केलेले दिग्दर्शक जयदीप सेन यांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मिथिलेश यांना काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे ते बरे होण्यासाठी लखनौला त्यांच्या मूळगावी गेले होते. 3 ऑगस्टच्या रात्री त्यांचं निधन झालं. “मिथिलेशजींसोबत माझं खूप जवळचं नातं होतं. मला त्यांच्यासोबत ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रेझी 4’ मध्ये काम करण्याचं सौभाग्य मिळालं. ‘क्रेझी 4’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. जेव्हा आपण एखाद्याला इतक्या जवळून ओळखता आणि तो व्यक्ती हे जग सोडून जातो तेव्हा खूप त्रास होतो”, अशा शब्दांत जयदीप सेन यांनी शोक व्यक्त केला.

‘कोई मिल गया’मध्ये मिथिलेश चतुर्वेदींची भूमिका

‘कोई मिल गया’ या चित्रपटात मिथिलेश चतुर्वेदी यांना कसं घेतलं, याविषयी जयदीप यांनी पुढे सांगितलं. “कोई मिल गया या चित्रपटामध्‍ये मिथिलेश चतुर्वेदींची कास्‍टिंग अतिशय रंजक पद्धतीने झाली होती. राकेश रोशन यांनी ‘फिजा’ हा चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये करिश्मा कपूर तोंडावर पाणी फेकते. ते दृश्य पाहून राकेशजींना तो अभिनेता खूप आवडला होता. या चित्रपटासाठी राकेशजींनी आणखी एक अभिनेता रवी झकड यांना बोलावलं होतं. पण करिश्मा कपूरने चित्रपटात ज्याच्या तोंडावर पाणी फेकलं तो अभिनेता कोण असा प्रश्न त्याला विचारला असता झकडजींनी सांगितलं की त्यांचं नाव मिथिलेश चतुर्वेदी आहे. मग आम्ही दोन्ही कलाकारांना ‘कोई मिल गया’ मध्ये साइन केलं”, असं ते म्हणाले

मिथिलेश चतुर्वेदींनी 1997 मध्ये केलं पदार्पण

मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकले. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2020 मध्ये ते ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.