Vicky-Katrina Wedding | लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई! विकी-कतरिना ‘या’ मुहूर्तावर घेणार सात फेरे!
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज (9 डिसेंबर) त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. या रॉयल वेडिंगची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिक्स सेन्स फोर्ट येथे विकी आणि कतरिना शाही पद्धतीने लग्नाचे सात फेरे घेणार आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज (9 डिसेंबर) त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. या रॉयल वेडिंगची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिक्स सेन्स फोर्ट येथे विकी आणि कतरिना शाही पद्धतीने लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. या राजेशाही लग्नातील सगळ्याच गोष्टी खूप गुपित ठेवण्यात आल्या आहेत.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या शुभ मुहूर्ताशी संबंधित माहिती समोर आली आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ ‘या’ शुभ मुहूर्तावर लग्न करणार!
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिना आज दुपारी 3:30 ते 3:45 दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. अगदी मंदिरासमोरील भागात हा लग्नमंडप लावण्यात आला आहे. 8 डिसेंबर रोजी या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहणारे पाहुणे दिवसभर सफारीवर गेले आणि नंतर कतरिना आणि विकीने त्यांच्या खास मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. कबीर खान, मिनी माथूर, शर्वरी वाघ, नेहा धुपिया, अंगद बेदी आणि राधिका मदान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली आहे आणि मेहंदी सोहळ्यातही भाग घेतला होता.
लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल!
विकी आणि कतरिना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न करणार आहेत. 7 डिसेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी मेहंदी, संगीत आणि हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अलीकडेच विकी आणि कतरिनाच्या लग्नाची पत्रिका इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या लग्नात फोन न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याअंतर्गत लग्नाच्या ठिकाणी पाहुणे फोन वापरू शकत नाहीत. लग्नाशी संबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करू शकत नाहीत.
ओटीटी प्लॅटफॉर्मसह करार
रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाला लग्नाचे खास फुटेज स्ट्रीम करण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मने 80 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. हा ट्रेंड परदेशात सामान्य आहे, जेथे सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाचे खास फोटो किंवा फुटेज मासिके आणि चॅनेलला विकतात. त्याचे खास क्षण पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म भारतातही हा ट्रेंड सुरू करू पाहत आहेत. मात्र, अद्याप विक-कॅटकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.