Vicky-Katrina Wedding | ‘ऑल सेट फोर मॅरेज!’, विकी-कतरिनाच्या लग्नाआधी पापाराझींसाठी खास मेजवानी!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नासाठी आता लवकरच राजस्थानला रवाना होतील.

Vicky-Katrina Wedding | ‘ऑल सेट फोर मॅरेज!’, विकी-कतरिनाच्या लग्नाआधी पापाराझींसाठी खास मेजवानी!
Vicky-Katrina

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नासाठी आता लवकरच राजस्थानला रवाना होतील. मात्र, आतापर्यंत दोघांनी लग्नाबाबत मौन बाळगले आहे. त्याच वेळी, पापाराझी त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहेत.

ईटीच्या रिपोर्टनुसार, विकीच्या घराबाहेर उभे असलेले कॅमेरामन आणि फोटोग्राफर्ससाठी विकीच्या कुटुंबीयांच्या वतीने खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विकी, सनी आणि शाम कौशल यांच्या ड्रायव्हरने कॅमेरामनसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. ही खास कल्पना विकीचे वडील शाम कौशल यांची होती.

विकीच्या घराबाहेर दिसली कतरिना कैफ!

काही काळापूर्वी कतरिना आणि तिचे कुटुंब विकी कौशलच्या घराबाहेर स्पॉट झाले होते. कतरिनाचा जवळचा मित्र लेखक-निर्माता अमृतपाल सिंग बिंद्राची कार विकीच्या घराबाहेर दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी विकी आणि कतरिनाने कोर्ट मॅरेज केले होते. विकी आणि कतरिना 9 डिसेंबरला राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिनाच्या घराबाहेरचे व्हिडीओही समोर आले आहेत, ज्यात त्याचे कुटुंब राजस्थानला रवाना होताना दिसत आहे.

लग्नाच्या ठिकाणी सजावटीची लगबग सुरु!

रिपब्लिक मीडिया रिपोर्टच्या छायाचित्रांनुसार लग्नाच्या तयारीचा अंदाज लावला जाऊ शकतो. हा फोटो शेअर करताना त्यांनी दावा केला आहे की, हा लग्नाच्या ठिकाणाचा फोटो आहे. तुम्हाला माहिती आहेच की, विकी आणि कतरिना राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील बरवारा किल्ल्यावर लग्न करणार आहेत. किल्ला दिवे आणि कंदिलांनी सजवला आहे. या जोडीच्या लग्नाच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत येत आहेत, आता किल्ल्याच्या सजावटीने त्याला पुष्टी दिली आहे. बारवारा किल्ला ‘सिक्स सेन्स फोर्ट’ म्हणूनही ओळखला जातो.

संगीतापासून लग्नाच्या थीमपर्यंत सारं काही सेट!

संगीत सोहळ्यापासून ते विकी आणि कतरिनाच्या लग्नापर्यंत सर्व कार्यक्रमांची थीम आधीच ठरलेली आहे. विकी आणि कतरिनाचे कुटुंबीय 6 डिसेंबरला राजस्थानला रवाना होतील. 7 डिसेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे.

लग्नात ‘नो फोन’ नियम!

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येणार आहेत. अतिथींच्या प्रवेशासाठी एक विशेष सिक्रेट कोड देण्यात आला आहे. यासोबतच लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ लीक होऊ नयेत, म्हणून लग्नात फोन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. विकी आणि कतरिनाने ज्याप्रकारे त्यांचे नाते गुपित ठेवले होते, तसेच त्यांना त्यांचे लग्न जगाच्या नजरेपासून दूर ठेवायचे आहे.

सेलिब्रिटी होणार सहभागी

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, करण जोहर, रोहित शेट्टी, वरुण धवन, नताशा दलाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

हेही वाचा :

Jacqueline Fernandes | मनी लाँड्रिंग प्रकरण : जॅकलिन फर्नांडिसला भारत सोडण्यास बंदी, ईडीने जारी केली लुकआउट नोटीस

BanLipstick | प्राजक्ता माळी का म्हणाली मला लिपस्टिकचा रंग नकोय, मला लिपस्टिक आवडत नाही, बॅन लिपस्टिक


Published On - 10:54 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI