Jawan: शाहरुखच्या ‘जवान’साठी विजय सेतुपतीने घेतलं तब्बल इतकं मानधन; आकडा पाहून विस्फारतील डोळे!

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर अभिनेत्री नयनतारा यामध्ये शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विजय सेतुपतीने किती मानधन घेतलं, याची माहिती समोर आली आहे.

Jawan: शाहरुखच्या 'जवान'साठी विजय सेतुपतीने घेतलं तब्बल इतकं मानधन; आकडा पाहून विस्फारतील डोळे!
Jawan: शाहरुखच्या 'जवान'साठी विजय सेतुपतीने घेतलं तब्बल इतकं मानधनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:43 AM

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच त्याच्या ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटात शाहरुखसोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीदेखील (Vijay Sethupathi) महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर अभिनेत्री नयनतारा यामध्ये शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विजय सेतुपतीने किती मानधन घेतलं, याची माहिती समोर आली आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, विजयने या चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल 21 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. एखाद्या चित्रपटासाठी विजय सेतुपतीकडून आकारण्यात आलेली ही रक्कम सर्वाधिक असल्याचं म्हटलं जात आहे. त्याने त्याच्या चित्रपटासाठी आतापर्यंत 15 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. ‘विक्रम’ या चित्रपटाच्या दमदार यशानंतर विजयने त्याचं मानधन जवळपास दीड पटीने वाढवलं आहे.

हे सुद्धा वाचा

जवानचं पोस्टर-

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखच्या ‘जवान’ या ॲक्शनपटात काम करण्यासाठी त्याने इतर दोन प्रोजेक्ट्स नाकारल्याचंही सांगितलं जात आहे. विजयच्या जागी आधी ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्तीला या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र तारखांची जुळवाजुळव होत नसल्याने आणि तब्येत बरी नसल्याने त्याने माघार घेतली. त्यानंतर अटलीने विजयला घेण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे शाहरुख आणि विजय हे एकमेकांचे चाहते आहेत. त्यामुळे शाहरुखने स्वत: जेव्हा विजय सेतुपतीला जवानमधील भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा तो नाकारू शकला नाही.

शाहरुख खान 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्यानंतर शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर परतलाच नाही. आता त्याच्या पठाण आणि जवान या दोन्ही चित्रपटांची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.