जेव्हा ऐश्वर्या रायने सांगितले की, तिचा आणि अभिषेक बच्चनचा वाद का झाला
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. दोघे ही आता वेगवेगळे राहत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकचा वाद नेमका का झाला. कोणत्या गोष्टीमुळे दोघेही आज एकत्र राहत नाहीयेत, सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत.

बॉलीवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेली ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे वेगळे पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना घटस्फोटा संदर्भातील सोशल मीडिया पोस्ट अभिषेकने लाईक केल्याने खळबळ आणखी वाढलीये. दरम्यान, ऐश्वर्या रायची जुनी मुलाखत पुन्हा समोर आली आहे, जी त्यांच्या नात्याची एक दुर्मिळ आणि स्पष्ट झलक देतेय.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने म्हटले होते, तिने सांगितले होते की, तिच्या आणि अभिषेकमध्ये अनेकदा मतभेद होतात. सुरुवातीला सांगताना ती कचरत होती. पण नंतर ऐश्वर्याने सांगितले होते की, त्यांच्यातील वाद ही खाजगी बाब आहे. “हे कोणालाच जाणून घ्यायचे नाही.” पण जसजसे संभाषण पुढे सरकत गेले, तसतसे त्यांनी मजबूत, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेले जोडपे म्हणून त्यांना येणाऱ्या आव्हानांबद्दल खुलासा केला.
ऐश्वर्या म्हणाली की, “आम्ही अजूनही वादविवाद आणि चर्चा यातील फरक शिकत आहोत, त्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या वादविवाद आणि चर्चा यांच्यात एक चांगली रेघ काय आहे हे अजूनही शोधत आहोत म्हणून आम्ही खूप चर्चा करतो.”
2007 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याला एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर यासाठी ओळखले जाते. प्रत्येक नात्याप्रमाणेच त्यांच्यात वाद आणि मतभेदाचे क्षण येतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिषेक बच्चन पुढे शाहरुख खान स्टारर ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, ऐश्वर्या राय बच्चन शेवटची ‘पोनियिन सेल्वन: II’ मध्ये दिसली होती.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्याबाबत अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरुच आहे. ऐश्वर्या राय आता बच्चन कुटुंबियांसोबत राहत नाही. दोघांमध्ये नेमका दुरावा का निर्माण झालाय याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहे. पण खरे कारण अजून ही समोर आलेले नाही.
