इंडस्ट्रीत आल्यावर बदललं नाव, आज 150 कोटींची मालकीण तरीही पती कॅमेरासमोर कधीच दाखवत नाही चेहरा

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून तिने कामाला सुरुवात केली. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. मात्र पतीमुळे तिला तिच्या आयुष्यात कठीण काळाचा सामना करावा लागला. आजही तिचा पती पापाराझींसमोर कधीच चेहरा दाखवत नाही.

इंडस्ट्रीत आल्यावर बदललं नाव, आज 150 कोटींची मालकीण तरीही पती कॅमेरासमोर कधीच दाखवत नाही चेहरा
ओळखलंत का या अभिनेत्रीला?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 12:05 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीत बरीच वर्षे टिकून राहायचं असेल तर उत्तम अभियनकौशल्य आणि सौंदर्य यांचा मिलाप असणं फार गरजेचं आहे. कलाविश्वात अशाच बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांच्याकडे पाहून ‘वय हा केवळ आकडा’ असंच म्हणावं लागेल. बॉलिवूडचा एक काळ गाजवलेल्या या अभिनेत्रींनी आजही इतक्या फिट अँड फाइन आहेत, की त्यांच्यासमोर तरुण अभिनेत्रीही फिक्या पडतील. या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली अशीच एक अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री इंडस्ट्रीत बऱ्याच वर्षांपासून काम करतेय. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून तिने कामाला सुरुवात केली. आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. मात्र पतीमुळे तिला तिच्या आयुष्यात कठीण काळाचा सामना करावा लागला. आजही तिचा पती पापाराझींसमोर कधीच चेहरा दाखवत नाही.

आतापर्यंत जर तुम्ही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर फोटोत दिसणारी ही चिमुकली शिल्पा शेट्टी आहे. शिल्पाने केवळ आपल्या दमदार अभिनयकौशल्यानेच नाही तर फिटनेस आणि फॅशन सेन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 8 जून 1975 रोजी कर्नाटकमधील मँगलोर याठिकाणी शिल्पाचा जन्म झाला. तिने तिच्या करिअरची सुरुवात एका छोट्याशा जाहिरातीतून केली. त्यानंतर सहाय्यक अभिनेत्री बनून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी ती ‘लिम्का’ या कोल्ड्रिंक ब्रँडच्या एका जाहिरातीत झळकली होती. 1993 मध्ये ती शाहरुख खानसोबत ‘बाजीगर’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटात काजोल मुख्य अभिनेत्री असतानाही शिल्पाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर शिल्पाने व्यावसायिक राज कुंद्राशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राज कुंद्रा आणि शिल्पाचा संसार चांगला सुरू असतानाच अचानक एके दिवशी पॉर्न व्हिडीओप्रकरणात राजचं नाव समोर आलं. त्याला अटक झाली आणि त्यानंतर जवळपास महिनाभर तो तुरूंगात होता. राज कुंद्राने जामिनावर सुटल्यानंतर पापाराझींसमोर कधीच आपला चेहरा दाखवल नाही. चित्रविचित्र मास्क लावून तो नेहमी पापाराझींसमोर येतो. आयुष्याच्या या कठीण काळात शिल्पा राजला घटस्फोट देणार असल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र या चर्चा केवळ अफवा ठरल्या होत्या.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.