CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?

मी कोणत्याही हार्ड डिस्क नष्ट केलेल्या नाहीत आणि मी कोणत्या आयटी प्रोफेशनलला बोलावलं नाही. मला हार्ड डिस्कबद्दल काहीही माहिती नाही

CBI Inquiry | आठव्या दिवशी रियाचा सीबीआयशी सामना, चौकशीत नेमकं काय झालं?
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 8:27 AM

मुंबई : सुशात सिंह राजपूतची आत्महत्या की हत्या? याचा तपास करण्यासाठी (CBI Questioned Rhea Chakraborty) सीबीआयची टीम 21 तारखेला मुंबईत दाखल झाली. सुरुवातीचे सात दिवस सुशांतच्या मित्रासह फ्लॅटवरील नोकरांची चौकशी केल्यानंतर आठव्या दिवशी रियाचा सामना सीबीआयशी झाला आहे (CBI Questioned Rhea Chakraborty).

सकाळी ठिक पावणे अकरा वाजता रिया चक्रवर्तीची कार सीबीआयचे अधिकारी थांबलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली आणि सुशांत सिंह प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या रियाचा सामना सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी झाला. रियासोबतच तिचा भाऊ शौविकही सीबीआय समोर आला. तब्बल दहा तास सीबीआयने रियाची कसून चौकशी केली.

सीबीआयच्या चौकशीत नेमकं काय झालं? रियाला सीबीआयने सुशांतबद्दल काय-काय विचारलं?

सीबीआय – सीबीआयच्या अधिकारी नुपूर प्रसाद यांनी रियाला पहिला प्रश्न केला, 8 जून ते 14 जूनच्या दरम्यान काय झालं?

रिया – 8 जूनला मी सुशांतच्या फ्लॅटवरुन निघाली. त्यामुळे 8 ते 14 जूनच्या दरम्यान काय झालं हे मलाही माहिती नाही.

सीबीआय – सुशांतला कोणता आजार होता?

रिया – सुशांतला मानसिक आजार होता आणि त्यासाठी तो उपचार घेत होता.

सीबीआय – तुम्ही सुशांतच्या आजाराबद्दल त्याच्या घरच्यांना का सांगितलं नाही?

रिया – सुशांतच्या बहिणीला माहिती होतं. त्यामुळे त्याच्या घरच्यांना माहिती नव्हतं, असं नाही आणि सुशांतचे त्याच्या कुटुंबीयांशी संबंध चांगले नव्हते. सुशांत आणि माझं नातं त्याच्या बहिणीला आवडत नव्हतं.

सीबीआय – तुम्ही सुशांतला कोणते ड्रग्स दिले?

रिया – मी कोणतेही ड्रग्ज दिले नाही. सुशांत स्वत:च मॅरिजुआना ड्रग्ज घेत होता.

सीबीआय – ड्रग्स संदर्भातले व्हॉट्सअॅप चॅटसमोर आलेत ते काय आहेत?

रिया – मी स्वत: ड्रग्ज घेतलेले नाही. सुशांतसाठी मी कॉन्डिनेशन करत होती एवढंच.

सीबीआय – सुशांतच्या घरातील 8 हार्ड डिस्कचं काय झालं?, त्या तुम्हीच डिलिट केल्या का?

रिया – मी कोणत्याही हार्ड डिस्क नष्ट केलेल्या नाहीत आणि मी कोणत्या आयटी प्रोफेशनलला बोलावलं नाही. मला हार्ड डिस्कबद्दल काहीही माहिती नाही (CBI Questioned Rhea Chakraborty).

रिया आणि शौविकला एकत्र बसवूनही सीबीआयने सवाल केले. तर 8 व्या दिवशी सिद्धार्थ पिठाणी, सॅम्युअल मिरांडा, कूक निरज सिंग यांचीही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

याआधी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, कूक निरज, दीपेश सावंत आणि केशव बचनेरची तासंतास सीबीआयने चौकशी केली. या सर्वांचा जबाब आणि रिया, शौविकच्या जबाबात काय अंतर आहे? हे तपासण्याचं काम सीबीआय करत आहे.

दुसरीकडे ड्रग्जचा अँगल समोर आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनेही जोरदारपणे तपासाला सुरुवात केली आहे. केपीएस मल्होत्रांच्या नेतृत्वात 3 पथकं मुंबईत दाखल झाली असून आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुंबईत दाखल होताच सुरुवातीचे 7 दिवस, सुशांतचे मित्र आणि फ्लॅटवरील कर्मचाऱ्यांची सीबीआयने कसून चौकशी केली. त्यामुळे सीबीआयकडे नोंदवण्यात आलेले जबाब आणि आता खुद्द रिया आणि तिचा भाऊ शौविक नेमकं काय सांगतोय? हे सीबीआयसाठी फार महत्वाचं आहे. 8 जून ते 14 जूनपर्यंत असं काय झालं की, 14 जूनला दुपारी सुशांत मृतावस्थेत आढळला? यावरुनच वेगवेगळ्या अँगलने प्रश्न केले जात आहेत.

CBI Questioned Rhea Chakraborty

संबंधित बातम्या :

“संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, फडणवीसांसह मंचावर” सचिन सावंत यांचे भाजपकडे बोट

सुशांतकडून टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या खात्यात 10 कोटी, ईडीकडून कसून चौकशी

सुशांतचा केअर टेकर सीबीआयच्या रडारवर, माफीचा साक्षीदार करण्यासाठी प्रयत्न?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.