AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 13 व्या वर्षी 43 वर्षीय गुरुसोबत लग्न, नवऱ्याने सोडली साथ, 8 महिन्यांच्या बाळाला दफन केल्यानंतर….

प्रसिद्ध सेलिब्रिटी महिलेचं खडतर आयुष्य, वयाच्या 13 व्या वर्षी 30 वर्षीय गुरुसोबत लग्न, लग्नानंतर स्वीकारला इस्लाम धर्म, पतीने सोडली साथ, 8 महिन्यांच्या बाळाला दफन केल्यानंतर..., महिला कायम असते चर्चेत...

वयाच्या 13 व्या वर्षी 43 वर्षीय गुरुसोबत लग्न, नवऱ्याने सोडली साथ, 8 महिन्यांच्या बाळाला दफन केल्यानंतर....
| Updated on: Nov 22, 2024 | 2:34 PM
Share

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी महिलांना खासगी आयुष्यात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक महिला आहेत, ज्यांना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. एका सेलिब्रिटी महिलेने वयाच्या 13 व्या वर्षी 30 वर्षीय गुरुसोबत लग्न केलं. पण तिला नवऱ्याची साथ लाभली नाही. त्यानंतर तिच्या मुलीचं निधन झालं… सध्या ज्या महिलेच्या आयुष्याबद्दल चर्चा रंगली आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून दिवंगत बॉलिवूड कोरियोग्राफर सरोज खान आहेत… निधनानंतर देखील त्या कायम चर्चेत असतात. झगमगत्या विश्वात त्यांची ओळख ‘मास्टर जी’ म्हणून आहे.

सरोज खान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, किशनचंद संधू आणि नोनी सिंग यांच्या घरात नागपाल यांचा जन्म झाला होता. पण वयाच्या 13 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार करत त्यांचं स्वतःचं नाव सरोज खान असं ठेवलं. एवढंच नाही तर, अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी 43 वर्षीय नृत्य गुरू सोहनलाल यांच्यासोबत लग्न केलं. पण आपल्यासोबत फसवणूक होत आहे याची सरोज खान यांना कल्पना नव्हती.

सरोज खान यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी नृत्य गुरू सोहनलाल विवाहित होते आणि त्यांना चार मुलं देखील होती. सत्य कळल्यानंतर सरोज खान यांना मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर, पतीने सरोज खान यांच्या मुलांना स्वतःचं नाव देण्यास देखील नकार दिला.

पतीने साथ सोडल्यानंतर खचलेल्या सरोज खान यांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. रोशन खान यांनी सरोज यांना लग्नाची मागणी घातली. पण सरोज खान यांनी रोशन खान यांच्या पुढे एक अट ठेवली… मुलांना स्वतःचं नाव द्यावं… असं अट रोशन खान यांच्यापुढे होती. सरोज यांनी अट रोशन खान यांनी मान्य केली.

सरोज खान यांच्या मुलीचं निधन

‘दम मारो दम’ गाण्याच्या शुटिंग पूर्वी सरोज खान यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला. सरोज खान यांच्या मुलीची प्रकृती गंभीर होती. पण सरोज खान यांना वेळेत काम देखील पूर्ण करायचं होतं. मुलीची प्रकृती गंभीर असल्यांमुळे सरोज खान यांनी 8 महिन्यांच्या मुलीला गमावलं.. 8 महिन्यांच्या मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर सरोज खान थेट कामासाठी सेटवर पोहोचल्या.

मुलीच्या निधनानंतर सरोज खान ‘हरे राम हरे कृष्णा’ सिनेमातील ‘दम मरो दम’ गाणं कोरियोग्राफ करण्यासाठी निघाल्या. रिपोर्टनुसार सरोज खान यांनी 350 सिनेमांपैकी तीन हजारपेक्षा अधिक गाणी कोरियोग्राफ केली आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा