Charu Asopa | घटस्फोटानंतर चारू असोपा हिने केलं दुसरं लग्न! फोटो समोर आल्यामुळे चर्चांना उधाण
सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटानंतर एका महिन्यात थाटला दुसरा संसार! चारू असोपा हिचा खास व्हिडीओ समोर आल्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई | अभिनेता सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन आणि अभिनेत्री चारु असोपा यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. पण राजीव आणि चारु यांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी राजीव आणि चारु यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर देखील दोघे एकत्र दिसले. पत्नी – पत्नी म्हणून विभक्त झालो असलो तरी, मित्र म्हणून एकमेकांच्या सोबत असू आणि एकत्र मुलीचा सांभाळ करु… असं सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी सांगितलं. घटस्फोटानंतर चारु हिने स्वतःच्या करियरवर लक्ष देण्याचं ठरवलं आहे. पण एक आई म्हणून अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. राजीव आणि चारु यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव झियाना असं आहे.
चारु कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण आता अभिनेत्री एका अशा व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीच्या कपाळावर कुंकू दिसत आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. चारुने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. ज्यामुळे चारु हिच्या खासगी आयुष्यात नक्की काय सुरु आहे, याची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीचा व्हिडीओ आणि कपाळावरील कुंकू पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी चारु हिला, ‘दुसरं लग्न केलं आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा आहे. तर ‘कपाळावर सिंदुर का?’ असा प्रश्न देखील एका चाहत्याने विचारला.. एवढंच नाही तर, व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की, ‘ती अभिनेत्री आहे आणि तिला शुटिंगसाठी कुंकू लावावा लागला असेल…’ सध्या सर्वत्र चारु हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.
दरम्यान, घटस्फोटापूर्वी राजीव आणि चारु यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. राजीव सेन याचे अनैतिक संबंध सुरू असल्याचा गंभीर दावा चारू असोपा हिने केला. त्यानंतर काही दिवसांमध्येच राजीव सेन यानेही एका मोठ्या टीव्ही अभिनेत्यासोबत चारू असोपा हिचे अफेअर सुरू असल्याचा खळबळजनक खुलासा केला.. ज्यामुळे अनेक दिवस दोघांमधील वादाची चर्चा रंगली होती. पण आता दोघांनी त्यांचा मार्ग निवडला आहे.
चारु असोपा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शिवाय चारुच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.
