Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकी कौशल मोडणार कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडचा रेकॉर्ड; फक्त इतकी पावलं दूर

अभिनेता विकी कौशल लवकरच रणबीर कपूरच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या 'छावा'ची जादू अद्याप कायम आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरू आहे. 'छावा'ने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

विकी कौशल मोडणार कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडचा रेकॉर्ड; फक्त इतकी पावलं दूर
विकी कौशलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 1:33 PM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाच्या कमाईचा वेग जरी मंदावला असला तरी प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात तो यशस्वी ठरत आहे. चौथ्या आठवड्यात ‘छावा’च्या कमाईत सतत घट झाल्याचं पहायला मिळालं. तर बुधवारी कमाईत आणखी पाच टक्क्यांची घसरण झाली. बुधवारी या चित्रपटाने 4.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. कमाईत दररोज काहीशी घट होत असली तरी हा चित्रपट आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे.

‘छावा’ने देशभरात आतापर्यंत 535.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यापैकी हिंदी व्हर्जनची कमाई 524.45 कोटी रुपये इतकी आहे. तर तेलुगू व्हर्जनच्या कमाईचा आकडा 11.1 कोटी रुपये इतका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने जगभरात 727.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत विकी कौशलच्या या चित्रपटाने सनी देओलच्या ‘गदर 2’, सलमान खानच्या ‘सुलतान’ आणि रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे. तर रणबीरच्याच ‘अॅनिमल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यापासून ‘छावा’ फक्त 18 कोटी रुपये दूर आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री 2’च्या कमाईचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ‘छावा’ला आणखी 63 कोटी रुपये कमवावे लागतील.

गदर 2- 686 कोटी रुपये सुलतान- 607.84 कोटी रुपये संजू- 438 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

‘छावा’ने पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपये कमावले आहेत. चौथ्या आठवड्याच्या शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत थेट 91 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. मात्र त्यानंतर कमाईचा आलेख उतरताच आहे. असं असलं तरी होळी आणि रंगपंचमीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाईंची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता, सुव्रत जोशी, संतोष जुवेकर यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.