AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’चा जबरदस्त टीझर व्हायरल; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने वेधलं लक्ष

अभिनेता विकी कौशलच्या आगामी 'छावा' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याचा लूक आणि टीझरमधील दृश्ये पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

'छावा'चा जबरदस्त टीझर व्हायरल; छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने वेधलं लक्ष
'छावा'चा टीझरImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 15, 2024 | 3:30 PM
Share

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट आज (15 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणखी एक सरप्राइज मिळालं. हा सरप्राइज होता, विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्याचाच टीझर थिएटरमध्ये दाखवण्यात आला आहे. या टीझरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या टीझरमध्ये विकी कौशल हा युद्धाच्या मैदानात शत्रूंशी लढताना दिसून येतोय. त्याची कधीही न पाहिलेली बाजू यात दाखवण्यात आली आहे. नेटकरी या टीझरचं कौतुक करत आहेत.

‘छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून ‘स्त्री 2’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. यामध्ये विकी कौशलसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पहा टीझर-

या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या टीझरमध्ये सहज पहायला मिळतंय. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘छावा’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती.

“आपण आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र छत्रपती संभाजी महाराज हेसुद्धा मोठे योद्धा होते. मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे”, असं लक्ष्मण उतेकर म्हणाले. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.