AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?

Abhijeet Dipke : अमेरिकेत शिक्षण घेवून भारतात आलेले अभिजीत दिपके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) ची स्थापना केली. पण ते भारतात का आले आणि त्यांच्यावर कोणात्या बड्या व्यक्ती प्रभाव? याचा खुलासा स्वतः दिपके यांनी केला आहे.

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव?  स्वतःच केला मोठा खुलासा?
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 18, 2026 | 2:12 PM
Share

Abhijeet Dipke : सध्या सर्वत्र फक्त ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) आणि पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची चर्चा सुरु आहे. पार्टी सुरु झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. अभिजीत दिपके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि भारतात परतले… अशात अनेकांना असा देखील प्रश्न पडला की, अमेरिका सोडून अभिजीत दिपके भारतात का आले आणि त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे? याचा खुलासा खुद्द अभिजीत दिपके यांनीच केला आहे.

सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांच्यावर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘स्वदेस’ सिनेमाचा मोठा प्रभाव असल्याचं सांगितलं. पोस्टमध्ये अभिजीत दिपके म्हणतात, ‘स्वदेस’ सिनेमात फातिमा बीनं कावेरी अम्माला सांगितलेल्या काही ओळी आठवल्या, “बता देना उस लड़के को अपने ही पानी में पिघल जाना बर्फ का मुकद्दर होता है…”, दिपके यांनी सांगितल्यानुसार, ते ‘स्वदेस’ सिनेमा पाहातच मोठे झाले. सिनेमा त्यांच्या मनाला खूप भावला, त्यांनी हा सिनेमा 100 पेक्षा अधिक वेळा पाहिला.

अभिजीत दिपके म्हणाले, ‘मी ‘स्वदेस’ मधील शाहरुख खानच्या सिनेमाचा खूप प्रभाव आहे.’ स्वातंत्र्य दिनी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावातून अभिजीत दिपके यानं स्कूल ठिक करो अभियान सुरू केलं. त्यावेळी दिपके यांनी ही आठवण सांगितली.

पोस्टमध्ये अभिजीत दिपके म्हणाले, ‘मोहन जेव्हा हरिदासला भेटायला जातो, तेव्हा त्याला दिसतं की, हरिदास आपल्या कुटुंबाला दिवसातून दोन वेळचं जेवणही देऊ शकत नाही. परतताना ट्रेनमध्ये बसलेला असताना, त्याला स्टेशनवर शाळेत जाण्याऐवजी पाणी विकणारं एक लहान मूल दिसतं… त्या मुलांना पाहिल्यानंतर मोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. माझ्यासोबत देखील असं झालं. तेव्हापासूनच, मोहननं ज्याप्रमाणे चरणपूरसाठी काहीतरी केलं, तसं आपल्या गावासाठीही काहीतरी करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात होती. त्या काळातही मला या परिस्थितीची जाणीव होती. माझ्या मनात एकच होतं, मी अमेरिकेतून भारतात येईल आणि माझ्या गावासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळेल…’, असं देखील अभिजीत दिपके पोस्टमध्ये म्हणाले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात