AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदींनी आता परवानगी दिली का?’, महिन्याभरानंतर बॉलिवूडकरांना जाग, CJP आंदोलनावर पोस्ट करताच पेटला भडका

NEET पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं आहे, तर जळपास 20 विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. अशात सेलिब्रिटींनी देखील यावर स्वतःचं मत मांडण्यास सुरुवात केली. पण यावर बोलण्यासाठी बॉलिवूडकरांनी फार उशीर केल्याचं म्हणजे सोशल मीडियावर चांगलाच भडका पेटला आहे.

'मोदींनी आता परवानगी दिली का?', महिन्याभरानंतर बॉलिवूडकरांना जाग, CJP आंदोलनावर पोस्ट करताच पेटला भडका
Bollywood Celebs
| Updated on: Jul 24, 2026 | 12:34 PM
Share

NEET पेपरफुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी दिल्लीत आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं आहे. सीजेपीच्या आंदोलनाला जवळपास 34 दिवस झाले आहेत आणि महिनाभरानंतर बॉलिवूडकरांनी यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींना मौन बाळगलं होतं. पण आता अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे. पण यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान, अजय देवगन यांसारख्या बड्या सेलिब्रिटींनी अद्याप यावर मौन बाळगलं आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना दिल्ली आणि मुंबई येथे सुरु असलेल्या आंदोलनाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, ‘मला गर्व आहे, मी अशा देशाची नागरिक आहे, जेथे तरुणांमध्ये आजही प्रश्न विचारण्याची आणि गॅट टियरचा समना करण्याची हिंमत आहे… पण त्यांना अशा परिस्थितीचा समना करावा लागयतोय याची खंत आहे…’.

अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अक्षय कुमार कुठे आहे?’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली का?’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘दीदी या मुद्द्यावर बोलण्यासाठी तुमच्या नवऱ्याला बोलावा…’, सोशल मीडियावर अन्य सेलिब्रिटींच्या पोस्ट देखील व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री करीना कपूरची पोस्ट

विद्यार्थ्यांचं समर्थन करत करीना कपूर म्हणाली, ‘जेव्हा संपूर्ण पिढी आपल्या भविष्यासाठी एकाच आवाजात बोलते, तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून घेणं उपकार नाही चर आपली जबाबदारी आहे. एका मुलासाठी शिक्षणाचं काय महत्त्व आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांचं भविष्य भक्कम होतं… पण शिक्षण तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा मुलांचा त्यावर विश्वास असतो आणि ज्या क्षणी त्यांना अशी शंका येऊ लागते की प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि क्षमता यांना प्रत्यक्षात काहीच महत्त्व नाही, तेव्हा तो विश्वास नाहीसा होतो.’

अभिनेत्री सारा अली खानची पोस्ट

विद्यार्थ्यांचं समर्थन करत सारा म्हणते, आपण त्यांचं म्हणणं मोकळ्या मनानं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांची मनापासून काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या सोबतीने वाटचाल केली पाहिजे. त्यांची स्वप्नं आपल्या स्वप्नांशी गुंफलेली आहेत; आपली स्वप्ने त्यांच्या स्वप्नांमध्ये सामावलेली आहेत.’

अभिनेता वरुण धवनची पोस्ट

अभिनेता वरुण धवन म्हणाला, ‘जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं स्वप्न भंग होतं, तेव्हा संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न भंग होतं. अशात जर त्यांना वाटत असेल व्यवस्थेने त्यांच्यावर अन्याय केला आहे, तर त्यांना प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करु नका. मी संबंधित अधिकाऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने घ्याव्यात आणि न्याय्य, पारदर्शक व सुनिश्चित करणारा तोडगा काढावा. ‘

अभिनेत्री मलायका अरोरी हिची पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करणं अशक्य असल्यानं तिने म्हटलं आहे, यावेळ तिने विद्यार्थ्यांच्या धडसाला देखील सलाम ठोकला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच