शस्त्र परवाना प्रकरणात सलमानला दिलासा, काळवीट प्रकरण झटका देणार?

काळवीट शिकार (Blackbuck Killing) आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

शस्त्र परवाना प्रकरणात सलमानला दिलासा, काळवीट प्रकरण झटका देणार?

मुंबई : काळवीट शिकार (Blackbuck Killing) आणि अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित शस्त्र परवाना प्रकरणात निकाल देताना जोधपूरच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी सलमान खानला दिलासा दिला आहे. सलमानने सादर केलेल्या शस्त्र परवान्याशी जोडलेले प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचा आरोप करत कोर्टाने राजस्थान सरकारची याचिका फेटाळली. (Consolation to Salman Khan in arms license case related to Blackbuck Killing case)

या प्रकरणावर दिलासा मिळाल्यानंतर सलमानने एक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. राजस्थानला 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, या चित्रपटातील कलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि स्थानिक व्यक्ती दुश्यंत सिंह यांनी काळवीटाची शिकार केली होती.

जवळपास दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या खटल्यात 5 एप्रिल 2018 रोजी जोधपूर सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, सलमानला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. इतरांची निर्दोष मुक्तता तर, त्याच वेळी उर्वरित आरोपी सैफ अली खान, नीलम, सोनाली, तब्बू आणि दुष्यंत सिंह यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

यानंतर सलमानने खालच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले होते. 7 एप्रिल रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सलमानला त्याच्याविरूद्ध खटल्याच्या शिक्षेची शिक्षा कायम ठेवत सशर्त जामीन मंजूर केला. यानंतर सलमानच्या वकिलाने त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता. या सर्व प्रकरणांत जिल्हा व सत्र न्यायाधीश जोधपूर जिल्ह्यात हे अपील प्रलंबित आहे. शिक्षेनंतर सुमारे अडीच वर्षांच्या या कालावधीत सलमानने काहीना काही कारणाने हजार राहणे टाळले आहे.

संबंधित बातम्या :

तुझ्या चित्रपटाचे शूटिंग थांबवू, काँग्रेसची धमकी; कंगनाचं काँग्रेसला सॉलिड उत्तर….

योगी भेटीचा अक्षयकुमारला फटका? ठाकरे सरकारची वक्रदृष्टी?; ‘सूर्यवंशी’चं काय होणार?

Sushant Singh Rajput suicide case | एनसीबीकडून ‘त्या’ अफवेचे खंडन, केला मोठा खुलासा

(Consolation to Salman Khan in arms license case related to Blackbuck Killing case)

Published On - 10:23 am, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI