‘तेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळही…’, Kriti Sanon – Om Raut यांच्या किसवर दीपिका चिखलिया यांची तीव्र नाराजी

तिरुपती बालाजी मंदिरात क्रितीला Kiss केल्यामुळे ओम राऊत वादाच्या भोवऱ्यात; पुजाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर 'रामायण' मालिकेतील 'सीता' म्हणजे दीपिका चिखलिया यांची संतप्त प्रतिक्रिया

'तेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळही...', Kriti Sanon - Om Raut यांच्या किसवर दीपिका चिखलिया यांची तीव्र नाराजी
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 4:36 PM

मुंबई : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सनॉन(Kriti Sanon) स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर तिरुपती येथे प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमातील कलाकार तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. जेथील गुडबाय किसने सर्वत्र खळबळ माजली आहे.. सोशल मीडियावर देखील अनेकांनी गुडबाय किसचा विरोध केला आहे. यावर पुजाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ‘रामायण’ मालिकेतील ‘सीता’ म्हणजे दीपिका चिखलिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र दीपिका चिखलिया यांची चर्चा आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत, दीपिका म्हणाल्या, ‘आज कलाकार भूमिका अनुभवत नाहीत… भूमिकेच्या भावना आजचे कलाकार समजू शकत नाहीत. मला असं वाटतं त्यांच्यासाठी रामायण फक्त एक सिनेमा असेल… क्रिती आजची अभिनेत्री आहे. तिने कदाचित स्वतःला भूमिकेत कधीच अनुभवलं नसेल. आताच्या पिढीमध्ये मिठी मारणं.. किस करणं सामान्य असेल.. पण क्रितीने कधी स्वतःला सीता मानलं नाही…’

पुढे दीपिका म्हणाल्या, ‘मी स्वतः सीताची भूमिका फक्त साकारली नाही तर, जगली आहे. आजचे कलाकार फक्त भूमिका साकारतात आणि सिनेमा संपल्यानंतर त्यांना कोणताच फरक पडत नाही. आमच्या वेळी कोणी एकमेकांचं नाव देखील घेत नव्हतं. लोकं आमच्या पाया पडायचे. आम्ही कोणाच्या जवळ देखील जावू शकत नव्हतो.. किस करणं तर खूप लांबची गोष्ट आहे..आदिपूरुषनंतर दुसऱ्या प्रोजेक्समध्ये व्यस्त होतील आणि विसरुण जातील.. पण आमच्या वेळी कधी असं झालं नाही…’ असं देखील चिखलिया म्हणाल्या..

हे सुद्धा वाचा

Adipurush | हॉटेल रुममध्ये जा..; ओम राऊत-क्रिती सनॉनच्या किसिंग व्हिडीओवर पुजाऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

सध्या सर्वत्र ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमातील ‘जय श्री राम’ गाण्याने चाहत्यांचं मन जिंकलं आहेत. ‘आदिपुरुष’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, प्रभास आणि क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाच विविध भाषांमध्ये सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात, अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉन जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंगने शेष आणि देवदत्त नागेनं बजरंग भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. दुसरा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते १६ जूनच्या प्रतीक्षेत आहेत.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.