दीपिका पदुकोणने लेकीचा पहिला वाढदिवसादिवस बनवला खूपच खास; स्वत: बनवली ही गोष्ट, पोस्ट पाहून चाहतेही आनंदी
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने त्यांची लेक दुआचा पहिला वाढदिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा केला. दीपिकाने लेकीसाठी स्वत: केली ही खास गोष्ट. चाहत्यांसोबत केली शेअर केली पोस्ट.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची चर्चा होते ते आता त्यांच्या चित्रपटांवरून नाही तर त्यांची लेक दुआवरून. कारण चाहते त्यांची मुलगी दुआला पाहण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लेक मुलगी दुआ आता एक वर्षांची झाली आहे. 8 सप्टेंबर 2024 रोजी हे जोडी पालक बनले.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने लेकीचा बर्थडे केला खास पद्धतीने साजरा
या जोडीने लेकीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. ज्याची एक झलक दीपिकाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये, अभिनेत्रीने लेकीसाठी वाढदिवसादिवशी एक खास गोष्ट केली आहे. ती म्हणजे लेकीसाठी दीपिकाने स्वत: केक बनवला आहे. दीपिकाने फार प्रयत्नाने तिच्यासाठी केक बनवला आहे. दीपिकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, एका स्टँडवर एक चॉकलेट केक ठेवलेला दिसत आहे. दीपिकाने हा केक फार मनापासून बनवल्याचं दिसत आहे. केकवर एक मेणबत्ती आहे आणि तसेच आजूबाजूला फुलांची सजावटही दिसत आहे.
‘ही माझी प्रेमाची भाषा…’
या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये दीपिकाने लिहिले आहे की, ‘ही माझी प्रेमाची भाषा… माझ्या मुलीसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त केक बनवला आहे’. दीपिकाच्या या पोस्टवर लोकांनी भरभरून खूप प्रेम दिलं आहे तसेच दुआला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.दरम्यान दीपिकाने ही पोस्ट उशिरा केली आहे. कारण तिने हा फोटो 10 सप्टेंबर रोजी पोस्ट केला आहे आणि दुआचा वाढदिवस 8 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट केला होता.
View this post on Instagram
दुआचा व्हिडिओ लीक
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की सध्या ती मुलीचा चेहरा दाखवणार नाही आणि लाइमलाइटपासून दूर शांतपणे तिला तिचे बालपण जगण्यास प्राधान्य देतील. तथापि, अलीकडेच दुआचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ विमानतळावरून व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये दीपिकाच्या मांडीवर एक लहान मुलगी दिसली. आणि ती खूप गोंडस दिसत होती.त्यांच्या संमतीशिवाय मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याबद्दल या दीपिकाने नाराजी व्यक्त केली.
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं
मुलगी दुआच्या जन्मापूर्वी दीपिकाने कल्की चित्रपटाच्या प्रमोशनपर्यंत खूप काम केले होते आणि चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही ती दिसली होती, परंतु त्यानंतर तिने रजा घेतली आणि अद्याप कोणत्याही चित्रपटाचे अधिकृतपणे शूटिंग सुरू केलेले नाही. तथापि, ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मात्र दिसली आहे. सध्या तिचे काही चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. आशा आहे की ती लवकरच त्यावर काम सुरू करेल.
