दीपिका पदुकोण हिच्या बहिणीच्या आयुष्यात मोठी खळबळ, देओल कुटुंबियांची होणार सून! काय आहे कनेक्शन?
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि देओल कुटुंबियांचं एक खास नातं तयार होत आहे... सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका हिची बहीण अनीशा हिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे... तर दोन्ही कुटुंबियांमध्ये नक्की काय कनेक्शन आहे जाणून घ्या...

सध्या लग्न सराई सुरु आहे, तर बॉलिवूडमध्ये देखील एक मोठं लग्न होणार आहे. दोन सुपरस्टार कुटुंब एका खास नात्यात बांधले जाणार आहेत… सध्या ज्या दोन कुटुंबाची चर्चा रंगत आहे, ते दीपिका पादुकोण आणि सनी देओल यांचं आहे… दीपिका हिची बहीण अनीशा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अनीशा लाईमलाईट पासून दूर असते. पण आता देओल कुटुंबियांसोबत अनीशा हिचं नाव जोडलं जात आहे. सध्या सर्वत्र अनीशा हिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अनीशा हिच्या लग्नाबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण अधिकृत घोषणा केल्यानंतर सनी देओळ याच्या कुटुंबियांसोबत तिचे खास संबंध असतील…
मिळालेल्या माहितीनुसार, अनिशा पदुकोण आणि रोहन आचार्यसोबत गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि आता हे नातं लग्नात रूपांतरित होणार आहे. रोहन आचार्य प्रसिद्धीच्या झोतात नसला, तरी तो एका प्रतिष्ठित चित्रपट कुटुंबातून येतो. सांगायचं झालं तर, रोहन हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांचा पणतू आहे. रोहन आणि सनी देओल यांच्यातील नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सनी देओलचा मुलगा करणची पत्नी दिशा आचार्य ही रोहनची बहीण आहे. अशात दीपिका आणि सनी देओल यांच्यात जवळचं नातं तयार होईल…
अनीशा आणि रोहन यांचा झाला आहे साखरपुडा
रिपोर्टनुसार, अनीशा आणि रोहण यांचा साखरपुडा झालेला आहे. पण दीपिका किंवा अनीशा यांनी अद्याप साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाहीत… रोहन याच्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, त्याचं सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट आहे. पण दीपिका त्याला फॉलो करते… शिवाय अनेक ठिकाणी रणबीर सिंह याचे आई – वडिल आणि रोहन याच्या आई – वडिलांमध्ये खास नातं दिसून आलं…
कुठे झाली अनीशा आणि रोहन यांची पहिली भेट
मिळालेल्या माहितीनुसार, अनिशा आणि रोहन यांची पहिली भेट रणवीर सिंगच्या कौटुंबिक कार्यक्रमात झाली. त्यादरम्यान त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि हळूहळू त्यांचं नातं फुलत गेलं. रोहन त्याच्या वडिलांच्या ट्रॅव्हल एजन्सी व्यवसायात काम करतो, तर अनिशा एक व्यावसायिक गोल्फपटू आहे आणि ती दीपिकाच्या ट्रस्ट, लीव्ह लव्ह लाफसाठी देखील काम करते. पण दोन्ही कुटुंबाकडून अद्याप नात्याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
